सरकारच्या कामगिरीवर टीका करणाऱ्या भाजपवर एकनाथ शिंदेंचा पलटवार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 29, 2021

सरकारच्या कामगिरीवर टीका करणाऱ्या भाजपवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

https://ift.tt/319qdFr
: महाविकास आघाडीने राज्यात सत्तास्थापन करून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून कामांबाबत विविध दावे केले जात आहेत, तर विरोधात असलेल्या भाजपकडून सरकारच्या कामगिरीवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नेते आणि कॅबिनेट मंत्री यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. () 'महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकच काय सर्वजण आमच्याबद्दल उलटसुलट चर्चा करत आहेत. विरोधकांना बोंबा मारू द्या, मात्र आम्ही आमचे काम करत आहोत, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत आहोत. त्यामुळे मला विरोधक काय म्हणतात त्याची चिंता नाही,' अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावात पत्रकारांशी बोलताना दिली. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांचा सोमवारी विवाहसोहळा होणार आहे. रविवारी हळदीच्या कार्यक्रमाला मंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून वधू-वराला आशीर्वाद दिले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ' सरकार स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून ठिकठिकाणी विकासकामे करत आहे. विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देत आहे. जळगाव जिल्ह्यातही रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. शेतकरी असो की सर्वसामान्य प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करत आहोत,' असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.