साताऱ्यात धक्कादायक घटना: वाहकाने एसटी नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 17, 2021

साताऱ्यात धक्कादायक घटना: वाहकाने एसटी नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड

https://ift.tt/3l3mT6f
: राज्यभरात सध्या एसटी संपामुळे वातावरण ढवळून निघालं आहे. सरकारच्या विनंतीनंतरही एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेला हा संप सध्या चर्चेत आहे. मात्र साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात दुफळी निर्माण झाल्याचं चित्र दिसत असून संपाच्या नवव्या दिवशी गालबोट लागलं आहे. एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण केली आहे. () या मारहाणीत नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटीचा संप सुरू असताना वाहक राजू पवार हे शिवशाही बस पुण्याला घेऊन गेले होते. यावर इतर संपकरी कर्मचाऱ्यांनी बस का घेऊन गेला? अशी विचारणा केली म्हणून किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी राजू पवार यांनी वाहतूक नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातला. या हल्ल्यानतंर घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस दाखल झाले. मारहाण करणाऱ्या वाहकास पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतलं असून त्याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.