Viral Video : देवाच्या पाया पडला, नंतर दानपेटी पळवली; ठाण्यातील मंदिरात चोरी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 14, 2021

Viral Video : देवाच्या पाया पडला, नंतर दानपेटी पळवली; ठाण्यातील मंदिरात चोरी

https://ift.tt/3Ci7g0e
ठाणे: ठाण्यातील मंदिरात झालेल्या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या आठवड्यात ठाण्यात झाली होती. या प्रकरणी चोरट्याला अटक केली आहे. मंदिरातील दानपेटी चोरट्याने पळवली होती. नौपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर ते सुद्धा हैराण झाले. मंदिरातील दानपेटी चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये चोरटा दानपेटी चोरण्याआधी देवाच्या पाया पडताना दिसत आहे. देवाच्या पाया पडल्यानंतर त्याने दानपेटी चोरल्याचे स्पष्ट दिसतंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या व्हिडिओमध्ये चोर हा मंदिरात असल्याचे दिसते. सुरुवातीला तो चोरटा फोनमध्ये काही तरी बघत आहे. तसंच आजूबाजूला कुणी आहे का, याचा अंदाज घेताना दिसतो. आजूबाजूला कुणी नाही याची खात्री झाल्यानंतर त्याने आपला फोन खिशात ठेवून दिला आणि त्यानंतर देवाच्या मूर्तीकडे जाताना दिसत आहे. तो देवाच्या पाया पडला. त्यानंतर त्याने देवाच्या मूर्तीसमोरील दानपेटी घेतली आणि तिथून पळून गेल्याचं फुटेजमध्ये दिसतंय. पश्चिमेकडील खोपट बस थांब्याच्या जवळील मंदिरात हा प्रकार घडला. मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची तक्रार मंदिरातील पुजारी महंत महावीरदास महाराज यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात केली. २०१९मध्येही घडली होती अशीच घटना, पण... २०१९ मध्येही असाच चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. हैदराबादच्या गनफौंड्री परिसरातील मंदिरात चोरी झाली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली होती. चोरी करण्यापूर्वी त्याने देवीच्या मूर्तीला प्रदक्षिणा घातल्या होत्या. तसेच त्याने माफीही मागितली होती. त्यानंतर देवीच्या पायाही पडला. इतकंच काय तर, चोरी करण्यापूर्वी त्याने आपल्या कपाळावर टिळा लावला होता. आजूबाजूला कुणी नाही याची खात्री झाल्यानंतर त्याने देवीच्या मूर्तीवरील मुकुट काढला आणि त्यानंतर तो पसार झाला होता.