पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचं होणार वितरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, April 24, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचं होणार वितरण

https://ift.tt/oS795rj
मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृत्यर्थ जाहीर झालेला पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार स्वीकारण्यासाठी आज, रविवारी मुंबईत येणार आहेत. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये सायंकाळी हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, संपूर्ण मंगेशकर कुटुंब उपस्थित असतील मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान, मंगेशकर कुटुंबीय, हृदयेश आर्ट्सच्या वतीने मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा ८०वा स्मृती सोहळा आयोजित केला आहे. त्यात, पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासह संगीत, नाटक, कला आदी क्षेत्रातील पुरस्कारही प्रदान केले जाणार आहे. संगीत क्षेत्रासाठीतील मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार गायक राहुल देशपांडे यांना, चित्रपट सेवेसाठीचा मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार आशा पारेख आणि जॅकी श्रॉफ यांना, मास्टर दीनानाथ आनंदमयी हा समाजसेवेसाठीचा पुरस्कार मुंबईचे डबेवाले (नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट) आणि सर्वोत्कृष्ट नाटकासाठी पुरस्कार संज्या छाया नाटकास देण्यात येणार आहे.