Video: आई होण्यासाठी सगळे प्रयत्न करून थकलेली अमृता राव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, April 23, 2022

Video: आई होण्यासाठी सगळे प्रयत्न करून थकलेली अमृता राव

https://ift.tt/9n2yOlW
मुंबई : 'विवाह' फेम अभिनेत्री आणि आर जे अनमोल यांनी २०१४ मध्ये लग्न केलं. त्यानंतर २०२० मध्ये त्यांना मुलगा झाला. या दोघांनी त्यांच्या बाळाचं नाव वीर असं ठेवलं. अलिकडेच अमृता राव हिनं तिची प्रेग्नंसी, आईवीएफ, आययुआय, सरोगसी असा सारा प्रेग्नंसीचा संघर्षाबद्दल मुलाखतीमध्ये मोकळेपणानं सांगितलं आहे. याच मुलाखतीमध्ये आई होण्यासाठी तिनं केलेला मानसिक-शारीरिक संघर्ष सांगितला आहे. हे सांगत असताना अमृता आणि अनमोल खूप भावुक झाले होते. अमृता राव हिनं युट्यूब चॅनेलवर 'कपल ऑफ थिंग्स' मध्ये तिचा प्रेग्नंसीचा स्ट्रगल सांगितला आहे. या मुलाखतीमध्ये अमृतानं तिचा आई होण्याचा खडतर प्रवास कथन केला आहे. तिनं सांगितलं की, 'तीन वर्ष आई होण्यासाठी खूप प्रयत्न केले. सतत गायनॅकॉलॉजिस्टकडे उपचारांसाठी जात होते. आई होण्यासाठीची आतुरता, ताण सारं काही अनुभवलं. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मला आययूआयबाबत सांगितलं. बाळ होण्यासाठी हरएकप्रकारे प्रयत्न केले पण कुठूनच गोड बातमी मिळत नव्हती. त्यामुळे आम्ही प्रयत्न सोडून दिले.' सर्व गोष्टीं ट्राय केल्या अमृता रावनं पुढं सांगितलं की, 'आययुआय उपचार पद्धती यशस्वी झाली नाही. त्यामुळे मग डॉक्टरांनी आम्हाला सरोगसी उपचार पद्धती ट्राय करायला सांगितलं. आम्ही देखील याबाबत खूप विचार केला. अखेर आम्ही त्यासाठी तयार झालो. या उपचारासाठी आम्ही अनेकजणींशी बोललो, काहींच्या मुलाखती देखील घेतल्या. सरोगसीसाठी प्रयत्न आम्ही सुरू केले.' पण पुन्हा पदरी निराशाच अमृतानं पुढं सांगितलं की, 'सरोगसची प्रक्रिया सुरू झाली. आम्ही आतुरतेनं गोड बातमीची वाट बघत होतो. एक दिवस डॉक्टरांचा फोन आला की सरोगसीद्वारे तुम्ही लवकरच आई-वडील होणार आहात..आम्हाला प्रचंड आनंद झाला.' अनमोलनं यावेळी सांगितलं की, 'आमच्यासाठी ही गोष्ट खूप आनंद देणारी होती. पण एक दिवस डॉक्टरांचा पुन्हा आम्हाला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आमचं बाळ जगात येण्याआधीच गेलं. सरोगसी अयशस्वी ठरली.आम्ही पूर्णपणे निराश झालो. अखेर आम्ही याच टप्प्यावर थांबण्याचा निर्णय घेतला.' आईवीएफचा पर्याय देखील ठरला अयशस्वी अमृता रावनं मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'सरोगसी उपचार अयशस्वी ठरल्यामुळे डॉक्टरांनी मला आईवीएफ उपचार ट्राय करायला सांगितलं.त्यासाठी मी तयार नव्हते. परंतु अनमोल यांच्यामते आमच्याकडं दुसरा कोणताच पर्याय नसल्यानं हे आम्हाला करायला हवं. मग आम्ही ते देखील ट्राय केलं. परंतु हे उपचार देखील अयशस्वी ठरले...आम्हाला यातूनही बाळ झालं नाही...' अमृतानं पुढं सांगितलं की, ' डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुन्हा एकदा आम्ही आईवीएफ ट्राय केलं परंतु ते देखील पुन्हा अयशस्वी ठरलं. तेव्हाच मी ठरवलं की आता पुन्हा आयवीएफ करणार नाही हे ठरवलं.' देवाला देखील साकडं घातलं अनमोल आणि अमृता यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'अनेक लोकांनी आम्हाला सल्ला दिली की प्रसिद्ध बाळ गणपती मंदिरात जावं. तिथं गेल्यानंतर सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे आम्ही तिथं देखील गेलो. होमिओपॅथी-आयुर्वेद सर्व काही ट्राय केलं अमृतानं मुलाखीमध्ये सांगितलं की,'मला अनेकांनी आयुर्वेदिक उपचार घेण्याचाही सल्ला दिला. त्यामुळे ते देखील घेतले. परंतु त्या औषधांमुळे मला त्रास झाला...उष्णतेने माझी त्वचा जळू लागली. मग काहींनी सांगितलं होमिओपॅथी घ्या. मग ती देखील ट्रीटमेंट घेतली...जे जे शक्य होतं ते सगळं केलं...पण आम्हाला गोड बातमी मिळतच नव्हती....आम्हाला बाळ होईल, ही अपेक्षा आम्ही सोडून दिली होती...' अखेर गुडन्यूज मिळाली मुलाखतीमध्ये अमृतानं पुढं सांगितलं की, 'जानेवारी २०२० मध्ये आम्ही सुट्ट्यांचं नियोजन केलं. गेल्या काही वर्षांपासून जो मानसिक ताण आम्ही सहन केला होता त्यातून बाहेर येऊन पुन्हा नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी आम्हाला ब्रेक हवा होता. आम्ही काही काळ बाहेर गेलो. तिथून परतल्यावर आम्ही नॉर्मल आयुष्य जगायला सुरुवात केली. मग एक दिवस अचानक मी प्रेग्नंट असल्याचं कन्फर्म झालं...जे तुमच्या नशीबात असतं ते तुम्हाला मिळतंच. भले उशीरा का होईना.... आईवीएफ, औषधं...कोणत्याच गोष्टींमुळे जे होऊ शकलं नाही ते अचानक झालं... हा देवाचाच आशिर्वाद होता... ११ मार्च २०२२ मध्ये मी प्रेग्नंट असल्यावर शिक्कामोर्तब झालं. आम्ही दोघंही खूप उत्सुक होतो... मग देशात लॉकडाऊन लागला....तेव्हाचा आमचा प्रवास खूपच कठीण होता...पण हा प्रवास आम्ही एकमेकांच्या साथीनं पार केला...'