ट्रक आणि दुचाकीची धडक; पती-पत्नीचा मृत्यू, अकोल्यातील मूर्तिजापुरातील घटना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 11, 2022

ट्रक आणि दुचाकीची धडक; पती-पत्नीचा मृत्यू, अकोल्यातील मूर्तिजापुरातील घटना

https://ift.tt/2hzLRPp
अकोला : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर कारंजा रोडवर दुचाकी व ट्रकचा झालाय. या अपघातात दुचाकीस्वार असलेल्या पती पत्नी यांचा जागीच मृत्यूनझाला. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी ट्रक जप्त केला असून ट्रक चालकालाही ताब्यात घेतले आहे. (Husband and wife die in a tragic accident at Murtijapur in Akola) अकोल्यातील मूर्तिजापूरवरून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या दहातोंडे फाटा येथे आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. एमएच ४ टीडी २२८३ क्रमांकाचा ट्रक आणि ज्युपिटर क्रमांक एमएच ३७ एस ५७३७ या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही पती पत्नी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. क्लिक करा आणि वाचा- ही घटना मुर्तीजापूर कारंजा मार्गावरील दहातोंडे फाट्यावर घडली. विनोद वासुदेवराव वानखडे (वय ५५) आणि पत्नी सविता विनोद वानखडे (वय ५०) असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे असून मृतक हे धनज बुद्रूकजवळील मेहा येथील रहिवाशी आहेत. याची माहिती मूर्तिजापूर येथील आपत्कालीन संस्था सुनील लक्ष वाणी यांना मिळताच त्यांनी रुग्णवाहिका रवाना केली होती. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणी मूर्तिजापुर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सत्यजीत मानकर यांनी अपघातची माहिती दिली. अवघ्या काही मिनिटात मदद करण्यासाठी भाजपचे आमदार हरिष पिंपळे द्वारा संचालित आपातकालीन पथकाने मोफत सहकार्य केले आहे. सध्या दोन्ही मृतकांचे शवविच्छेदन करण्यासाठी अकोला शासकीय रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. दोघा पती-पत्नीची मृत्यूची माहिती वानखेडे कुटुंबीयांना देण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा-