
: मध्यवर्ती कारागृहातील एका बंदीवानाचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास समोर आली. मंगेश अनिल हिरकणे (वय ३६, रा. कटंजी, जि. गोंदिया) असे या मृत बंदीवानाचे नाव आहे. (the was found in a water tank in ) मंगेश कारागृहात शिक्षा भोगत होता. तो दीड वर्षे संचित रजेवर होता. कारागृहात परतल्यावर त्याला प्रशासनाने पहारेकरी म्हणून रात्री १२ ते २ दरम्यान कामाची जबाबदारी दिली होती. गुरूवारी रात्री तो सेवा देऊन त्याच्या नेहमीच्या ठिकाणी परतला. यावेळी दुसरा कैदी पहारेकरी म्हणून सेवेवर जात असतांना त्याने मंगेशला झोपत नव्हता. काही वेळात दुसऱ्या पहारेकऱ्याची नजर चुकवून मंगेश तेथून निघून गेला. त्यानंतर रात्री २.४५ वाजता त्याचा मृतदेहच एका पाण्याच्या टाकीत आढळला. क्लिक करा आणि वाचा- या विषयावर कारागृह अधिक्षक अनुपकुमार कुमरे म्हणाले, मंगेशची मानसिक स्थिती गेल्या काही दिवसांपासून योग्य नव्हती, असे त्याच्या शेजारच्या काही कैद्यांनी सांगितले आहे. परंतु, शवविच्छेदन अहवालात मंगेशच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असून या प्रकरणाची चौकशीही होईल. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, आढळलेल्या पाण्याच्या टाकीत जास्त पाणी नव्हते. तूर्त धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जात असल्याचे समजते. क्लिक करा आणि वाचा-