पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात, पुणे मुंबईतील कार्यक्रमांना हजेरी, कसा असेल दौरा? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 14, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात, पुणे मुंबईतील कार्यक्रमांना हजेरी, कसा असेल दौरा?

https://ift.tt/tlONnsX
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी १४ जून रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. नरेंद्र मोदी पुणे आणि मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. नरेंद्र मोदी प्रथम पुण्याती देहू येथील कार्यक्रमाला उपस्थिती लावतील. त्यानंतर ते मुंबईतील तीन कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. देहूतील कार्यक्रमावेळी नरेंद्र मोदी वारकऱ्यांशी संवाद साधतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 1:45 च्या सुमाराला पंतप्रधान देहू, पुणे येथील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं उद्घाटन करतील. देहूतील कार्यक्रम संपल्यानंतर नरेंद्र मोदी मुंबई मधील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करण्यासाठी उपस्थित राहतील. त्यानंतर संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होतील. संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. उद्या दुपारी साधारण 12 च्या सुमारास पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. साधारण दीड ते दोन तास हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे संत आणि कवी होते, जे त्यांचे अभंग आणि अध्यात्मिक कीर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजाभिमुख पूजनासाठी ओळखले जातात. ते देहू इथे रहायचे. त्यांच्या निधनानंतर एक शिळा मंदिर बांधण्यात आलं, पण त्याची औपचारिक रचना देऊळ म्हणून करण्यात आली नव्हती. या मंदिराची 36 शिखरांसह दगडी पुनर्बांधणी करण्यात आली असून या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमसाठी 50 हजारांच्या आसपास वारकरी येणार असल्याचे संस्थांकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय पंतप्रधानांना देण्यासाठी संस्थांकडून खास पगडी तयार करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देहू आणि परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला असून देहूला अगदी छावणीचे स्वरूप आले असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या मुख्य मंदिर परिसर, सभेचे ठिकाण आदी परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच, स्वच्छता आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. सध्या मंदिर परिसरात फक्त पास धारकांनाच प्रवेश दिला जात आहे. मंदिर परिसरात बंदोबस्तासाठी पोलीस बंदोबस्त पोलीस उपायुक्त 10 सहायक पोलिस आयुक्त 10 पोलीस निरीक्षक 100 पोलीस उपनिरीक्षक, सहायक 300 पोलीस कर्मचारी 2000 याशिवाय एसपीजी, एनएसजी, सीआरपीएफ, एसआरपीएफ, फोर्स वन यांची पथकेही तैनात आहेत. नरेंद्र मोदींचे मुंबईतील कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करतील. जल भूषण इमारत हे 1885 सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. जुनी इमारत पाडून नवी इमारत बांधण्यात आली आहे. सन 2016 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनामध्ये एक भुयार सापडले होते. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटीश या भुयाराचा उपयोग करत होते. 2019 साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले. या भुयारात बनवण्यात आलेली गॅलरी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले अशा स्वरूपाचे एकमेव संग्रहालय असून मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधान मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील सहभागी होतील. हे वृत्तपत्र गेली 200 वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत आहे. या दुर्मिळ विक्रमाचे स्मरण म्हणून या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.