
: डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे मैदानाजवळ बावनचाळ भागात रविवारी रात्री एका व्यक्तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सदर व्यक्तिला मारून आडोशाला फेकून देण्यात आले होते. रविवारी रात्री खून झाला असून सोमवारी दुपारी या भागात दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा खुनाचा प्रकार उघड झाला आहे.दरम्यान, विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्ति विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( person in of ) डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे ग्राउंडवर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. दुपारच्या सुमारास काही नागरिकांचं या मृतदेहाकडे लक्ष गेलं. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला. क्लिक करा आणि वाचा- मृतदेहाच्या डोक्यावर मारल्याच्या जखमी दिसत असल्याने सदर इसमाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करत कल्याण क्राईम ब्रांचने पुढील तपास सुरू केला आहे. मयत इसम भंगारवेचक असल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. क्लिक करा आणि वाचा - त्याची हत्या झाली का?, हत्या झाली असेल ती का व कुणी केली याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्ति विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा -