वेस्ट इंडिजला धुळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज, तिसऱ्या वनडेत कोणाला संधी मिळेल पाहा... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 27, 2022

वेस्ट इंडिजला धुळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज, तिसऱ्या वनडेत कोणाला संधी मिळेल पाहा...

https://ift.tt/AQBIge9
पोर्ट ऑफ स्पेन : भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या मालिकेतील तिसरी वन-डे क्रिकेट लढत आज (बुधवार) रंगणार आहे. भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता विंडीजविरुद्ध निर्भेळ यशाचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. भारतीय संघाने एकाच संघाविरुद्ध सलग बारा वन-डे मालिका जिंकून जागतिक विक्रम रचला आहे. मागील दोन्ही वन-डे लढती चुरशीच्या झाल्या. विशेष म्हणजे अखेरच्या षटकापर्यंत रंगल्या. पहिली वन-डे भारताने तीन धावांनी जिंकली, तर दुसरी वन-डे दोन विकेटनी जिंकली. दोन्ही वन-डे लढतींत दोन्ही डावांत प्रत्येकी ३००हून अधिक धावा झाल्या. पहिल्या वन-डेत भारताकडून फलंदाजीत शिखर धवन, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरने अर्धशतकी ठोकली, तर गोलंदाजीत महंमद सिराज, शार्दूल ठाकूर, यझुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. पहिल्या वन-डेत भारताने ७ बाद ३०८ धावा केल्या होत्या. यानंतर विंडीजला ६ बाद ३०५ धावांत रोखले होते. दुसऱ्या वन-डेत विंडीजने ६ बाद ३११ धावांपर्यंत मजल मारली होती. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना श्रेयस अय्यर, संजू सॅमसन यांनी अर्धशतके ठोकली होती. अखेरच्या दहा षटकांत भारताला शंभर धावांची गरज होती. हे आव्हानात्मक लक्ष्य अक्षर पटेलने तळाच्या फलंदाजांना साथीला घेऊन साध्य केले. त्याने ३५ चेंडूंत पाच षटकार व तीन चौकारांसह नाबाद ६४ धावांची खेळी केली. आता या कामगिरीत सातत्य राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल. ऋतुराजला संधी?राखीव सलामीवीर म्हणून ऋतुराज गायकवाडला तिसऱ्या वन-डेत संधी मिळणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. भारताने मालिका जिंकली असल्याने राखीव खेळाडूंना संधी देण्यात येईल, असे वाटते आहे. मात्र, शुभमन गिलने मागील दोन्ही वन-डेत ६४ आणि ४३ धावा केल्या आहेत. त्यामुळे चांगल्या लयीत असताना त्याला बाहेर बसविणार का, हा प्रश्नच आहे. दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मिळालेल्या संधीचे सोने करता आले नव्हते. वेगवान गोलंदाजांनी त्याला अडचणीत आणले होते. सूर्यकुमारला विश्रांती?सूर्यकुमार यादव आणि दीपक हुडा यांचा अपवाद वगळता या मालिकेत सर्व प्रमुख फलंदाजांनी अर्धशतके ठोकली आहेत. तेव्हा या दोघांना विश्रांती मिळणार, असे वाटत आहे. मधल्या फळीत ईशान किशनचा पर्याय भारताकडे आहे. त्याचबरोबर पहिल्या दोन वन-डेला अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे मुकला होता. अर्थात, तिसऱ्या वन-डेसाठी तो उपलब्ध आहे, की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अक्षर पटेलने अष्टपैलू कामगिरी करून दुसऱ्या वन-डेत सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे त्याला विश्रांती मिळेल, असे तरी वाटत नाही. गोलंदाजीत बदल शक्यकर्णधार शिखर धवन गोलंदाजीत बदल करू शकतो. धवनने दोन डावखुरे फिरकी गोलंदाज घेण्याचा निर्णय घेतल्यास यझुवेंद्र चहलला विश्रांती दिली जाऊ शकते. दुसरीकडे, अर्शदीप सिंगला आवेश खानच्या जागी संधी मिळू शकते. आवेश खानला वन-डे पदार्पणात साजेशी कामगिरी करता आली नव्हती. आवेश आणि प्रसिध कृष्णा यांची शैली जवळपास सारखी आहे. प्रयोग म्हणून गोलंदाजीत बदल होऊ शकतात. विंडीजकडून अपेक्षाविंडीज संघाने या मालिकेत सर्वोत्तम प्रयत्न केले. मात्र, भारतीय संघाला रोखण्यात यजमान विंडीजला अपयश आले. दोन्ही लढतींत विंडीजला थोडक्यात पराभव पत्करावा लागला आहे. विंडीजने सलग आठ वन-डे लढती गमावल्या आहेत. ही पराभवाची मालिका खंडित करण्याचा विंडीजचा प्रयत्न असेल. तिसरी लढतही क्वीन्स पार्क ओव्हलवरच होणार आहे. त्यामुळे या वेळीही धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्याची वेळ : सायंकाळी ७ पासूनथेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्ट्सवरून