श्री विठ्ठल आश्रमातील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; पंढरपुरात चिंतेचे वातावरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 18, 2022

श्री विठ्ठल आश्रमातील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; पंढरपुरात चिंतेचे वातावरण

https://ift.tt/URPILCY
: पंढरपूर येथील श्री विठ्ठल आश्रमातील ४० बालकांना झाली आहे. दुपारच्या जेवणामध्ये बासुंदी, पत्ता कोबी, बेसन, चपाती, भजीचा समावेश होता. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आश्रमातील विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने पंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयांमध्ये सर्व बालकांना आणि पुरुषांना दाखल करण्यात आले. बाधितांपैकी दहा ते पंधराजणांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. सध्या पंढरपूर सामान्य रुग्णालयामधील विषबाधा झालेले रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याची माहिती उपजिल्हा डॉक्टर अरविंद गिराम वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. (30 students in shri vitthal ashram get ) विषबाधा झालेले सर्व विद्यार्थी श्री विठ्ठल आश्रमामध्ये धार्मिक शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये काही स्थानिक तर काही वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रदीप विठ्ठल शिरोळे, सुदर्शन सगळे, ओंकार निर्मले, प्रणव शिंदे, पवन सुलतानी, दर्शन जाधव, गोरख जयभद्र, विनायक नाडे, वैभव कुंभार, आदिनाथ मालकर, केशव पवार, अभिजीत शिंदे , लक्ष्मण फुके, ऋषिकेश कोल्हे, नितीन गव्हाड, ऋषिकेश तांबे, अर्जुन पवार, गणेश राहणे, प्रताप गीते, ऋषिकेश चव्हाण, अभिषेक मोरे, करण परदेशी, स्वागत गाजरे, हरिशचंद्र लोखंडे, अतुल सुरवसे, वैभव शेटे, माऊली गवाड यांचा समावेश आहे. क्लिक करा आणि वाचा- हे सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. यांमध्ये पळसगाव, निमगाव, हळेगाव, वैजापूर, तळोशी, ढाणगाव दौंड, परभणी, कोल्हापूर , शेळवे पंढरपूर, पाटणे, जालना, सिंदखेड, सावरखेड, नाशिक, ढवळगाव, कोपरगाव, जालना, पैठण, दौंड येथील आहेत. क्लिक करा आणि वाचा- सर्वांची प्रकृती स्थिर पंढरपूर येथील श्री विठ्ठल आश्रम ६५ एकर जवळील मठामध्ये दुपारी जेवण झाल्यावर संध्याकाळी उलटी, पोटदुखी, जुलाब यांचा त्रास होऊ लागल्यामुळे उपजिल्हा रूग्णालयात ३० ते ३२ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले. जेवणानंतर आपण बासुंदी, पत्ताकोबी, बेसन, खाल्याचे रूग्णाकडून सांगण्यात आले आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती उपजिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद गिराम यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा-