रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; वीसही नगरसेवकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 26, 2022

रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; वीसही नगरसेवकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा

https://ift.tt/9aJwjAi
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या २० नगरसेवकांनी आज आमदार यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरीचे २० नगरसेवक उदय सामंत यांच्या सोबत आहेत.आमदार उदय सामंत यांच्या झालेल्या चर्चेमध्ये २० नगरसेवकांनी शिंदे याना पाठिंबा दिला असून आम्ही सगळे शिवसेनेतच आहोत असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे आता रत्नागिरीत राजकीय भूकंपाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. ( of have supported Eknath Shinde) आज रत्नागिरी शहरातील नगरसेवक पुढच्या दौऱ्यात तालुक्यातील सगळया ग्रामीण भागातील पदाधिकारी असतील असेही सामंत यांनी स्पष्ट केले. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घेतील. त्यामुळे काही नगरसेवक इकडे आहेत, तर काही तिकडे आहेत, आशा ज्या काही चर्चा सुरू होत्या त्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे, असे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. क्लिक करा आणि वाचा- नगरसेवकांसमवेत मोठे नेते शिंदे गटात सहभागी झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यावर व विशेषत: रत्नागिरी मतदार संघावर आमदार उदय सामंत यांचे एकहाती वर्चस्व कायम आहे. सामंत हे शिंदे गटात सामील झाल्यापासून रत्नागिरीत खासदार विनायक राऊत यांनी सामंत यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. क्लिक करा आणि वाचा- शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी देखील रत्नागिरीतील ९ नगरसेवक शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले होते. तसे त्यांनी प्रतिज्ञापत्र केले असल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र हा दावा फोल ठरला आहे. आज सोमवारी रत्नागिरीत आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी नगरपालिकेचे २० नगरसेवक आपल्यासोबत असल्याचे सांगितले तसे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रत्नागिरी नगरसेवक विषयाला आता पूर्णविराम मिळाला आहे. क्लिक करा आणि वाचा- आजच्या घटनेमुळे शिवसेनेकडून कितीही दावे केले गेले असले, तरी आमदार उदय सामंत यांची रत्नागिरी मतदारसंघावर घट्ट पकड असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.