शिवा मोहोड अन् मिटकरींच्या वादात नवा ट्वीस्ट; माहिला शिक्षिकेने केले गंभीर आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 4, 2022

शिवा मोहोड अन् मिटकरींच्या वादात नवा ट्वीस्ट; माहिला शिक्षिकेने केले गंभीर आरोप

https://ift.tt/3awkXeZ
: (Amol Mitkari) आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष (Shiva Mohod) यांच्यातील वाद नव्या वळणावर पोहोचलाय. आता शिवा मोहोड यांच्यावर त्यांच्याच संस्थेतील एका आदिवासी शिक्षिकेने छळवणुकीचे आरोप केले. मिना देवीदास चव्हाण असं या शिक्षिकेचं नाव आहे. मोहोड यांनी आपण आदिवासी असल्याने छळवणूक केल्याचा आरोप शिक्षिकेनं केलाय. शिवा मोहोड यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. यावर मोहोड यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, काहीतरी पाहायचं आणि शिवाला कोंडीत पकडायचं, असं काम केल्या जात आहेत. तुम्ही कितीही माझ्या विरुद्ध षडयंत्र रचा, मात्र दहा दिवसानंतर संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड करणारचं, असा इशारा नाव न घेता मिटकरींना दिलाय. आपण आमदार मिटकरींवर आरोप केल्यानंतरच हे जुनं प्रकरण समोर का?, असा सवालही त्यांनी केलाय. वाचा- आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वादात नवा ट्वीस्ट आलाय. आता मिटकरींवर आरोप करणाऱ्या मोहोड यांच्यावर त्यांच्याच संस्थेतील एका शिक्षिकेनं छळवणूकीचा आरोप लावलाय. अकोल्यातील कौलखेड भागात शिवा मोहोड अध्यक्ष असलेल्या श्रीराम शिक्षण संस्थेचं श्रीराम विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. या संस्थेत मिना चव्हाण हे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांना मागच्या महिन्यात मोहोड यांच्या संस्थेनं शाळेतून बडतर्फ केलं. शिवा मोहोड यांनी आपण आदिवासी असल्यानं छळवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, अनेकदा चव्हाण यांनी शिक्षण विभाग, पोलीस विभाग आणि संबंधित विभागाला तक्रारी केल्या. मात्र त्याची दखल घेतल्या गेली नाहीये, असे चव्हाण म्हणाले. शिक्षिका मिना चव्हाण यांचे आरोप - १) शिवा मोहोड यांनी आपण आदिवासी असल्यानं छळवणूक केल्याचा शिक्षिकेचा आरोप. २) नोकरी वाचविण्यासाठी मोहोड यांनी पैसे मागितल्याचा शिक्षिकेचा आरोप. ३) वर्गाबाहेर, शाळेबाहेर उभं करणं, अंगावर धावून जाण्याचे प्रकार शिवा मोहोड यांनी केल्याचा आरोप. ४) शिक्षिका मिना चव्हाण यांना मागच्या महिन्यात मोहोड यांच्या संस्थेनं शाळेतून बडतर्फ केलंय. ५) शिवा मोहोड यांच्यापासून आपल्याला आणि कुटूंबाला धोका असल्याची शिक्षिकेची तक्रार. वाचा- कितीही षडयंत्र रचा; भांडाफोड करणारचं- शिवा मोहोड महिला शिक्षिकाच्या आरोपानंतर, शिवा मोहोड़ यांनी 'मटा ऑनलाइन' प्रतिक्रिया दिली आहे की, माझ्यावर आज शाळेतील शिक्षिकेने आरोप लावले. हे आरोप आजचे नाहीये, गेल्या एक वर्षाचे आहेत. तेव्हा माझ्यावर ॲट्रॉसिटी अंतगर्त गुन्हा दाखल झाला होता. नागपुर न्याययायाने या प्रकरणाला स्थगिती दिली, आता हे प्रकरण न्यायालयात पडलेले आहे. सध्याच्या परिस्थितीत माझ्यावर कुठेही ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल नाहीये. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी मिटकरींवर आरोप लावले, त्याला चिडून संबंधित माणसाने (अमोल मिटकरी) षडयंत्र सुरू केलंय. अशा षडयंत्रला 'मी' भीक घालत नाही, माझ्या घराकडे माणसं पाठवल्या जात आहेत, वाहनाचा पाठलाग केला जात आहे. अशा गोष्टींना घाबरून जाणारा नाही, एवढंचं सांगतोय, भांडाफोड करणार म्हणजे करणारच, असे कितीही आरोप लावा. सदर शिक्षिका दहा महीने गैरहजर होती, त्यामुळ त्यांची खाते निहाय चौकशी करून त्यांना काढण्याय आलं. त्यांच्यात मी जबाबदार नाही, संचालक मंडळासह सर्व मिळून ही कारवाई झाली, शिक्षण विभागाला तशी माहिती दिली. परंतू काहीतरी शिवाच्या विरुद्ध पाहायचं आणि शिवाला कोंडीत पकडायचं, अन् त्रास दयायचा, हे प्रकार आपण समजून घ्यावे, आता येत्या दहा दिवसात भांडाफोड करणारचं, असा इशारा शिवा मोहोड यांनी अमोल मिटकरींना नाव न घेता दिला आहे. वाचा- मिटकरी पुढीचे काही महिने मीडियासमोर दिसणार नाही शिवा मोहाड आणि मिटकरींच्या यांच्या वादाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याकडून सावरासावर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांनी काल मोहोड आणि आज मिटकरींच्या दोघांच्या भेटी घेतल्या. दरम्यान, पक्षातीलच वरिष्ठ नेत्यांनी अमोल मिटकरी यांना आता कोणत्याही विषयावर मीडियासमोर भाष्य करण्यास थांबविले आहे, त्यामुळे अमोल मिटकरी आता पुढील काही महिने मीडियासमोर दिसणार नाही, अशी राजकीय सूत्रांनी माहिती दिली आहे. या संदर्भात आम्ही अमोल मिटकरींशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.