जुन्या भांडणाचा राग, महिला समोर दिसताच बदला घेतला, नातेवाईकांच्या डोळ्या देखत घडली थरारक घटना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 11, 2022

जुन्या भांडणाचा राग, महिला समोर दिसताच बदला घेतला, नातेवाईकांच्या डोळ्या देखत घडली थरारक घटना

https://ift.tt/0XDWHsg
बारामती: गेल्या भांडणाच्या कारणावरुन महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर तालुक्यातील मौजे लाकडी येथे घडला आहे. रुपाली शेखर काटे (रा,लाकडी ता. इंदापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ललेंद्र मारुती शिंदे (वय ३५ वर्षे, रा. साठेनगर ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेंद्र रामचंद्र जराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी ललेंद्र शिंदे यांची सावत्र बहीण रुपाली काटे सकाळी साडेसहाच्या सुमारास पार्थ विधीसाठी गेली होती. त्या ठिकाणी आरोपी राजेंद्र जराड याने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने वार करत रुपाली यांचा गळा चिरून त्यांचा खून केला आणि तिथून पळून गेला. अशी माहिती फिर्यादीचे नातेवाईक कल्पना खरात यांनी फोनवरुन दिली. फिर्यादी घटनास्थळी गेले असता रुपाली या मयत अवस्थेत दिसून आल्या. त्यांचा गळा चिरलेला दिसून आला. हेही वाचा - पोलिसांनी रुग्णवाहिका बोलवून मयत रुपाली यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जात पुढील कारवाई सुरु केली. सदर घटनेचा उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत. हेही वाचा -