शरद पवार, आशिष शेलार आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात आघाडी, सत्तेसाठी राजकारण्यांचा मोठा गेम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 11, 2022

शरद पवार, आशिष शेलार आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात आघाडी, सत्तेसाठी राजकारण्यांचा मोठा गेम

https://ift.tt/k56eYlN
मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) माजी अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोमवारी एमसीए अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. शेलार हे 'शरद पवार-आशिष शेलार' गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असतील. आता अध्यक्षपदासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष शेलार आणि भारताचे माजी राष्ट्रीय प्रशिक्षक संदीप पाटील यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस होणार आहे. या संघटनेच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेलार यांच्यासह जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, विहंग सरनाईक यांनीही अर्ज दाखल केले. संघटनेच्या मावळत्या कार्यकारीणीतील सचिव संजय नाईक यांनीही अध्यक्ष तसेच सहसचिवपदासाठी अर्ज दाखल केला; पण 'पवार-शेलार गटा'ने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांचा समावेश नाही. याच यादीनुसार आव्हाड आणि नार्वेकर हे कार्यकारीणीचे उमेदवार आहेत. याच गटाने मावळत्या कार्यकारीणीतील सदस्य सरनाईक यांनी मुंबई आयपीएल टी-२० प्रमुख पदाची उमेदवारी दिली आहे. माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि राजकीय नेते यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी स्पर्धा होण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी माधव मंत्री (मनोहर जोशी), अजित वाडेकर (शरद पवार) आणि दिलीप वेंगसरकर (विलासराव देशमुख) हे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू यापूर्वी अध्यक्षपदाच्या निवडणूकीत राजकीय नेत्यांविरुद्ध पराभूत झाले आहेत. दरम्यान, या निवडणुकीसाठी संदीप पाटील हे 'शरद पवार गटाचे उमेदवार असतील असे जाहीर करण्यात आले होते. 'पवार गटाने आपले उमेदवार यापूर्वीच जाहीर केले होते. त्यांनी निवडणूकीसाठी अर्जही दाखल केले आहेत. मात्र आता निवडणूकीचे अर्ज दाखल करण्याच्या नव्याने स्थापन झालेल्या पवार-शेलार गटाने आपले उमेदवार जाहीर केले. त्यामुळे सध्या निवडणुकीत 'शरद पवार गट' तसेच 'शरद पवार-आशिष शेलार गट' असे दोन प्रतिस्पर्धी गट आहेत. 'शरद पवार गटा'ने सोमवारी संध्याकाळी माटुंगा येथे क्लब प्रतिनिधींसह संपर्क कार्यक्रम ठरवला आहे. त्यावेळी पवार गटातील उमेदवारांची बैठक होण्याची शक्यता आहे. दरम्यान शरद पवार गटाने आपले नाव बदलून मुंबई क्रिकेट ग्रुप केल्याचे सुत्रांकडून कळते आहे. 'मी निवडणूकीतून माघार घेणार नाही', असे संदीप पाटील यांनी सांगितले. 'आपल्याला पदाधिकारी कोण हवेत हे ठरवण्याचा आधिकार मतदारांचा आहे. मी माघार घेणार नाही हे निश्चित आहे', असेही पाटील म्हणाले. दरम्यान, शरद पवार गटात सचिवपदाचे असलेले उमेदवार अजिंक्य नाईक यांचे नाव शरद पवार-आशिष शेलार गटाच्या उमेदवारांच्या यादीही सचिवपदासाठी आहे. पवार गटाच्या उमेदवारांत गौरव पय्याडे हे सहसचिव पदाचे उमेदवार आहेत, तर पवार-शेलार गटाच्या यादीत कार्यकारीणी सदस्यपदाचे. उमेदवारी अर्ज माघार घेईपर्यंत या संघटनेच्या निवडणूकीत घडामोडी होणार हे निश्चित. 'शरद पवार-आशिष शेलार गट' उमेदवार, अध्यक्ष ः आशिष शेलार. उपाध्यक्ष ः अमोल काळे. सचिव ः अजिंक्य नाईक. सहसचिव ः दीपक पाटील. खजिनदार ः अरमान मलिक. कार्यकारीणी सदस्य ः जितेंद्र आव्हाड, गौरव पय्याडे, मिलिंद नार्वेकर, खोदादाद येझगिरी, सूरज सामंत, निलेश भोसले, दीपक मिस्त्री, अन्य दोन उमेदवारांची निवड शेलार करणार. मुंबई प्रीमियर टी-२० लीग, अध्यक्ष ः विहंग सरनाईक. उपाध्यक्ष ः गणेश अय्यर ऑनलाइन मतदानाची पाटील यांची सूचनामुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीत प्रत्यक्ष मतदानासह ऑनलाईन मतदानही असावे अशी सूचना अध्यक्षपदाचे उमेदवार संदीप पाटील यांनी केली आहे. सुनील गावस्करांसारख्या महान खेळाडूंचे मत मोलाचे आहे. त्यांच्यासारख्या अनेकांना ऑनलाइन मतदानाची सुविधा हवी, असे पाटील यांनी सांगितले. या निवडणुकीत एकूण ५१ माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू मतदार आहेत. त्यातील ३३ पुरुष क्रिकेटपटू आहेत.