भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्याप्रकरणी तपास सुरू ; डॉग स्कॉड ही अवघ्या पन्नास मीटरवर घुटमळले​ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 21, 2022

भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्याप्रकरणी तपास सुरू ; डॉग स्कॉड ही अवघ्या पन्नास मीटरवर घुटमळले​

https://ift.tt/S4w20gK
: मंगळवारी रात्री चिपळूण शहरातील पाग भागातील यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. अज्ञातांचा शोध घेण्यासाठी चिपळूण पोलिसांनी आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले असून आठ संशयितांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तपासासाठी आणलेले डॉग स्कॉड ही अवघ्या पन्नास मीटरवर जाऊन थांबल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जाधव यांच्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या पाग येथील दोन ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आरोपींच्या शोध घेण्यासाठी हे फुटेज उपयोगी पडण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त होत आहे. (In the case of the attack on 's house, on war footing) तसेच आज चिपळूण पोलिसांनी आमदार भास्कर जाधव यांच्या कुटुंबियांचे जबाब देखील नोंदवले असल्याची माहिती पुढे येत आहे. त्याच बरोबर आठ संशयितांचे जबाब घेण्यात आले. तर कॉल डेटा रेकॉर्डही (सीडीआर) मागविण्यात आले आहेत. त्याचबरोबर परिसरातील पेट्रोल पंप, हॉटेल या ठिकाणचे सीसीटी व्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लवकच लागणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. चिपळुणात श्वान पथक दाखल गुरुवारी रात्री चिपळुणात श्वान पथक दाखल झाले. ते याच परिसरात घुटमळले. काही ठसेदेखील पोलिसांनी घेतले आहेत.तपासाच्या कामासाठी सात पथके तयार केली आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, चार उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूणमध्ये फौजफाट्यासह ठाण मांडून आहेत. खेड, रत्नागिरी, दापोली येथील पोलिस अधिकारी चिपळुणात कार्यरत आहेत. आमदार भास्कर जाधव यांच्या घरासमोरील तसेच पाग परिसर, बाजारपेठ या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. संशयितांचे मोबाईल देखील तपासले जाणार आहेत. घटनेला चोवीस तास उलटून गेल्यानंतरही संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले नाही. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी करत आहेत.