ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनताच लंडनमध्ये अमर अकबर अँथनीचं समीकरण पूर्ण, जाणून घ्या कसं? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 26, 2022

ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनताच लंडनमध्ये अमर अकबर अँथनीचं समीकरण पूर्ण, जाणून घ्या कसं?

https://ift.tt/sW37YHB
नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील एक गाजलेला सिनेमा म्हणून अमर अकबर अँथनीचं नाव घेतलं जातं. या सिनेमात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि ऋषी कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट १९७७ मध्ये प्रदर्शित झाला होता. भारतासारख्या देशात सामाजिक बंधुभावाच्या नजरेतून या चित्रपटाकडं पाहिलं जातं. विनोद खन्नानं पोलीस अधिकाऱ्यांची म्हणजेत अमर खन्नाची भूमिका केली होती. तर, ऋषी कपूर यांनी अकबर इलाहाबादी, आणि अँथनी गोन्सालवीस यांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली होती. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यावर लंडनमध्ये अमर अकबर अँथनीचं समीकरण पूर्ण झाल्याचं बोललं जातंय. भारतीय वंशाचे हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनले. ब्रिटनचं पंतप्रधानपद मिळवणारे ऋषी सुनक पहिले भारतीयं वंशाचे व्यक्ती ठरले आहेत. ऋषी सुनक यांनी टोरी लीडरशीपमध्ये पेनी मॉर्डंट यांना मागलं टाकत पंतप्रधानपद मिळवलं. त्यांना १८० हून अधिक खासदारांचा पाठिंबा होता. बोरिस जॉन्सन आणि पेनी मॉर्डंट यांनी माघार घेतल्यानं सुनक यांचा मार्ग मोकळा झाला. ऋषी सुनक हे हिंदू धर्मीय आहेत. तर लंडनचे महापौर सादिक अमन खान हे मुस्लीम धर्मीय आहेत. तर, ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स हे ख्रिश्चन धर्मीय आहेत. त्यामुळे एक प्रकारे लंडनमध्ये अमर अकबर अँथनी हे समीकरण पूर्ण झाल्याचं बोललं जातंय. कोण आहेत लंडनचे महापौर? सादिक अमन खान हे मजूर पक्षाचे खासदार होते. सध्या ते लंडन शहराचे महापौर आहेत. ९ मे २०१६ पासून ते महापौर म्हणून कार्यरत आहेत. टुटिंमधून ते खासदार झाले होते. डावे आणि समाजवादी लोकशाहीववादी म्हणून ते ओळखले जातात. २०१६ ला ते हुजूर पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करुन लंडनचे महापौर बनले आहेत. किंग चार्ल्स ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन झाल्यानंतर किंग चार्ल्स यांच्याकडे राजघराण्याची सूत्रं आली आहेत. ऋषी सुनक यांनी आज किंग चार्ल्स यांची भेट घेतली. ऋषी सुनक यांनी चार्ल्स यांची भेट घेतल्यानं त्यांच्या पंतप्रधानपदावर शिक्कामोर्तब झालं आहे.