मुंबईत 'या' सहा स्थानकात फलाट तिकिटासाठी आता ५० रुपये मोजावे लागणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 22, 2022

मुंबईत 'या' सहा स्थानकात फलाट तिकिटासाठी आता ५० रुपये मोजावे लागणार

https://ift.tt/kexSBCp
म. टा. प्रतिनिधी, मुंबई दिवाळीनिमित्त रेल्वे गाड्याना आणि रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी आहे. रेल्वे स्थानकातील गर्दी नियंत्रणासाठी दरात पाच पट वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे १० रुपयांच्या फलाट तिकिटासाठी आता ५० रुपये मोजावे लागणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, दादर, कल्याण आणि पनवेल या सहा स्थानकात हे फलाट तिकीट दर लागू असणार आहेत. हे दर शनिवार, २२ ऑक्टोबरपासून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी आहेत. गर्दी नियोजनासाठी तात्पुरते उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी शुक्रवारी रात्री उशिरा दिली. वाचा-