
सांगली : ओढ्याला आलेल्या पुरात अल्टो गाडी घालने चालकाला चांगलेचं महागात पडले आहे. पुराच्या पाण्यात गाडीसह चालक वाहून गेल्याचा प्रकार तासगाव तालुक्यातल्या वासुंबे येथे घडला आहे. तर पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या गाडी चालकाला वाचवण्यासाठी एका १२ वर्षीय मुलाने उडी मारली. मात्र तो चालकाला वाचू शकला नाही. तर काही वेळाने वाहून जाणारी गाडी मात्र काढण्यात स्थानिक नागरिकांना यश मिळाले आहे. ( in flood water in ) सांगलीच्या तासगाव शहरातील कापूर ओढा येथे पुलावरून कार घेऊन जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी पाण्यात वाहून गेल्याने उत्तम रामराव पाटील हे बेपत्ता झाले आहेत. तासगाव शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी येथून तासगाव शहराकडे येण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे. हा रस्ता कापूर ओढ्यातून येतो. ओढ्यात सिमेंट च्या पाईप टाकून कच्चा पूल करण्यात आला आहे. गेले आठ दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने या पुलावरूनही पाणी गेले आहे. व बाजूला मोठे खड्डे असल्याने तिथे पाणी खोल आहे. क्लिक करा आणि वाचा- वासुंबे येथील उत्तम पाटील हे आपल्या चारचाकी गाडीतून इंदिरानगर कडून तासगाव शहराकडे येत होते. यावेळी गाडी पुलावर आल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने व पाण्याला गती असल्याने कार पाण्यात बुडाली. यावेळी बाजूला मासेमारी करणाऱ्या रोशन साळुंखे वय १२ वर्षे या मुलाने पाण्यात उडी मारून यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. क्लिक करा आणि वाचा- उत्तम पाटील हे दु्र्दैवाने कारसह बुडाले. त्यांनतर पोलिसांसह परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत वाहून जाणारी गाडी पाण्यातून बाहेर काढली. मात्र, त्यात उत्तम पाटील आढळले नाहीत. उशिरापर्यंत उत्तम पाटील यांची शोध सुरू होता. क्लिक करा आणि वाचा-