
नवी दिल्ली : आयसीसी टी-२० विश्वचषकातील सामन्यात रविवारी भारताने पाकिस्तानवर ४ विकेट्सनी चित्तथरारक विजय मिळवला. या सामन्यात आणि हार्दिक पंड्या यांनी पाचव्या विकेटसाठी ११३ धावांची ही खेळी केली. ही खेळी फारच महत्त्वाची ठरली. आजच्या सामन्यात विराट कोहलीने ५३ बॉलमध्ये ८२ धावा केल्या. विराट कोहली याची ही अप्रतिम खेळी सर्वांच्या स्मरणात राहिली. यांनीही विराट कोहलीचे कौतुक केले आहे. तसेच भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून विराट कोहलीचे कौतुक केले आहे. पंतप्रधान आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'भारतीय संघाने चांगला संघर्ष करून विजय मिळवला! आजच्या सामन्यासंदर्भात विराट कोहलीचा विशेष उल्लेख करावा लागेल.विराट कोहलीने उत्तम कामगिरी केली. विराट कोहलीने नेत्रदीपक कामगिरी करत उल्लेखनीय दृढता दाखवली. पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा.' क्लिक करा आणि वाचा- मेलबर्न येथे रंगलेल्या या सामन्यात विराट कोहलीने ५३ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या. आपले शानदार खेळी खेळत विराट कोहलीने ४ षटकार आणि ६ चौकार मारत उपस्थितांच्या. विराटने हार्दिक पंड्या सोबत शतकी भागिदारी केली. पंड्याने ३७ चेंडूत ४० धावा केल्या. क्लिक करा आणि वाचा- भारतीय क्रिकेट संघाने एका वर्षात आतापर्यंत ३९ विजयांवर आपले नाव नोंदवले आहे. या वर्षी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला ३८वा सामना जिंकला होता. टी-२०, वनडे आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारांमधील हा ३८वा विजय होता. आता रविवारी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नवर पाकिस्तानचा पराभव करत भारताने ३९वा विजय साकारला. या विजयानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे.