अलिबागच्या तहसीलदार मिनल दळवी अँटी करप्शनच्या जाळ्यात, दोन लाखांच्या लाच प्रकरणी ताब्यात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 12, 2022

अलिबागच्या तहसीलदार मिनल दळवी अँटी करप्शनच्या जाळ्यात, दोन लाखांच्या लाच प्रकरणी ताब्यात

https://ift.tt/ckuHO9G
रायगड/अलिबाग : रायगड जिल्हयातील अलिबाग तालुक्यातील एक जमीन विषयावर अपील सुनावणी सुरु असताना त्याचा निकाल एकाच्या बाजूने देण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करणं अलिबागच्या तहसिलदार यांना महागात पडलं आहे. दोन लाखांची मागणी करुन ते स्वीकारल्याप्रकरणी अँटी करप्शनच्या नवी मुंबई येथील पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.या पथकाने याला रंगेहाथ अटक केली तर तहसीलदार मिनल कृष्णा दळवी यांना ताब्यात घेतलं. यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. ही मोठी कारवाई शुक्रवारी सायंकाळी उशिरा करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. सास-यांचे आईने, सास-यांना बक्षीसपत्राने दिलेलय जमीनीचे सास-यांचे नावे सातबारा नोंद होण्यासाठी आदेश देण्याकरीता व सासऱ्यांचे भाऊ यांनी बक्षीस पत्रावर हरकत घेतलेल्या अपिल प्रकरणाचा निकाल तक्रारदार यांचे सासऱ्यांच्या बाजूने देण्याकरीता अलिबाग तहसीलदार यांना ताब्यात घेण्यात आलं. एजंट राकेश चव्हाण याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीनं रगेहाथ पकडलं. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजीचे पाच लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार नवीमुंबईच्या अँटी करप्शन ऑफिसकडे करण्यात आली होती. लाचेच्या मागणीच्या सत्यता पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदार ३,००,०००/- लाचेच्या रक्कमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी एजंट राकेश रमाकांत चव्हाण यांच्याकडे दोन लाख रुपये देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लगेचच लावण्यात आलेल्या सापळयात कारवाई दरम्यान अलिबाग नगरपालिका इमारती समोरील आरके इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये तकारदार यांचेकडून रु.२,००,०००/- पंच साक्षीदारा समक्ष स्वीकारल्याने रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यानंतर तहसीलदार मिनल दळवी यांना राहत्या घरातून दोन लाख रुपये मागणी करुन ते स्वीकारल्याप्रकरणी अँटी करप्शनच्या नवी मुंबई येथील पथकाने ताब्यात घेतले आहे पुढील गुन्हा दाखल करण्याची कारवाई अलिबाग पोलीस ठाण्यात सुरू आहे.