राहुल गांधी आज औरंगाबादेत, दुपारनंतर सुरतला असेल धावता दौरा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 21, 2022

राहुल गांधी आज औरंगाबादेत, दुपारनंतर सुरतला असेल धावता दौरा

https://ift.tt/Wfel8O5
औरंगाबाद : काँग्रेस नेते राहुल गांधी आज, सोमवारी (२१ नोव्हेंबर) औरंगाबादेत येत आहेत. सोमवारी रात्री त्यांचा औरंगाबादेत मुक्काम राहील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी सोमवारी दुपारी बारा वाजता हेलिकॉप्टरने जळगाव जामोद येथून औरंगाबाद विमानतळावर येतील. तेथून विमानाने सुरत येथे जातील. गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गांधी यांचा सुरतला धावता दौरा असेल. सोमवारी सायंकाळी साडेसहाला ते औरंगाबादेत परततील. रात्री त्यांचा औरंगाबादेत मुक्काम असेल. ते मंगळवारी सकाळी सातला हेलिकॉप्टरने जळगाव जामोदकडे रवाना होतील. राहुल यांच्या स्वागतासाठी काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी साडेपाचला मुकुंदवाडी बस थांब्यावर उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी केले आहे.