
मुंबई: काँग्रेसचे खासदार यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान यांच्यावर केलेल्या टीकेचे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या कारणावरून राहुल गांधी () यांची महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रा () स्थगित करण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे () यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा महाराष्ट्रातच थांबवा आणि त्यांना कायद्याचं राज्य असल्याचं दाखवून द्या, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार 'भारत जोडो यात्रे'बाबत टोकाचा निर्णय घेणार का, हे पाहावे लागेल. राहुल गांधी यांनी मंगळवारी वाशिम येथे भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या सभेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. देशातील दलित आणि आदिवासी समाजाला त्यांचे हक्क मिळू नयेत, असे भाजपला वाटते. त्यामुळे भाजप पक्ष दररोज संविधानावर हल्ला चढवत आहे. यावेळी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा उल्लेख केला. इंग्रजांच्या विरोधात लढताना बिरसा मुंडा एक इंचही मागे हटले नाही. ते शहीद झाले. ते आदिवासी समाजाचं प्रतिक आहेत, ते तुमच्या समाजासाठी मार्गदर्शक आहेत. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत.