
सोलापूर : सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये शनिवारी सायंकाळी लागली. या आगीत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महानगरपालिकेचे अग्निशामक दल अधिकारी व कर्मचारी सायंकाळी ६ वाजल्यापासून आगीवर पाण्याचा फवारा करत होते. पण आगीन रौद्ररूप धारण केले असून आग नियंत्रणात येत नव्हती. अग्निशमन दलाने जवळपास १५ ते २० गाड्यांचा फवारा केला आहे. तरीही आग वाढतच चालली होती. ( were gutted in a raging ) सोलापुरातील अनेक नागरिकांची धाव अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील नीलम नगर येथील दोन टॉवेल कारखाने, एक रेडिमेड गारमेंट कारखान्याला शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. सोशल मीडियामार्फत आगीचे व्हिडीओ आणि फोटो वाऱ्यासारखे वायरल झाले. आगीचे रौद्र रूप पाहून अनेक नागरिक नीलम नगर परिसरातील एमआयडीसीकडे धाव घेत होते. सोलापूर शहर पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी देखील दाखल झाले. क्लिक करा आणि वाचा- लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान अक्कलकोट रोड परिसरातील नीलम नगर येथील मुनोत सूत कारखान्याला आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे सूत, कच्चा माल, पक्का माल जळून खाक झाला आहे. वसंत नेमचंद मुनोत एक्स्पोर्ट टॉवेल कारखान्याला आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दल अधिकारी केदार आवटे यांनी दिली.आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-