
वाराणसी: मृत्यू कधीही, कुठेही आणि कोणालाही येऊ शकतो, हे खरंच आहे. याचीच प्रचिती देणारा एक धक्कादायक प्रकार यूपीच्या वाराणसीमध्ये घडला आहे. येथे कँट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोजुबीर परिसरात रस्त्यावर गाडी चालवत असताना चालकाचा मृत्यू झाला. हा प्रकार घडला तेव्हा टॅक्सीमधून दोन प्रवासी प्रवास करत होते. या घटनेनंतर प्रवाशांची भंबेरी उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसी येथील टॅक्सी चालक उमाशंकर शनिवारी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दोन प्रवाशांना घेऊन परतत होते. दरम्यान, भोजुबीर येथे पोहोचल्यावर अचानक चालत्या कारमध्ये त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांची कार रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला धडकली. यावेळी गाडीचा वेग कमी असल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. हेही वाचा - या घटनेनंतर गाडीत बसलेल्या प्रवाशांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून उमाशंकर यांना खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उमाशंकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यात येत असल्याचे चौकी प्रभारी अर्दाली बाजार शिवानंद सिसोदिया यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून अशी प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. कुठे लग्नात नाचताना अचानक कुणाचा मृत्यू होतोय, तर कुठे स्टेज शोमध्ये कलाकारांचं निधन होत आहे. अशा परिस्थितीत वाराणसीतही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. हेही वाचा -