
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहितला दुखापत झाली होती. त्यानंतर तो भारतात परत आला. रोहितच्या गैरहजेरीत उपकर्णधार केएल राहुल याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात त्याला कर्णधापद देण्यात आले होते. रोहित शर्मा संघाबाहेर झाल्यानंतर बीसीसीआयने या दौऱ्यासाठी पुन्हा एकदा खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यात अनुभवी फलंदाज याला उपकर्धारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. वर्षाच्या सुरुवातीला खराब फॉर्ममुळे पुजारा याला संघातून बाहेर करण्यात आले होते. इंग्लंड दौऱ्यात तो पुन्हा संघात परतला होता. भारताकडून ९६ कसोटी खेळणाऱ्या पुजाराने अद्याप एकही सामन्यात संघाचे नेतृत्व केले नाही. पण तो अनेकदा उपकर्णधार राहिला आहे. वाचा- ... पंतला डच्चू जुलै महिन्यात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध एक कसोटी मॅच खेळली होती. तेव्हा कर्णधार रोहित शर्माला करोनाची लागण झाली होती, तर राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर होता. इंग्लंडविरुद्धच्या त्या मॅचसाठी जसप्रीत बुमराहने संघाचे नेतृत्व केले होते. तर विकेटकीपर ऋषभ पंतला उपकर्णधार करण्यात आले होते. यावेळी मात्र पंतकडून ही जबाबदारी काढून टाकण्यात आली आहे. पंत केल्या काही काळापासून फॉर्ममध्ये देखील नाही. वनडे आणि टी-२० संघात देखील त्याच्या असण्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पहिल्या कसोटीसाठीचा भारतीय संघ केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, , केएस भरत, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू ईश्वरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट