टोकाचं पाऊल उचलण्याआधी पोलीस शिपायाने केला अखेरचा फोन, त्यानंतर विहिरीत रहाटाला... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 17, 2023

टोकाचं पाऊल उचलण्याआधी पोलीस शिपायाने केला अखेरचा फोन, त्यानंतर विहिरीत रहाटाला...

https://ift.tt/bOeLIEJ
शिरूर, पुणे : शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस शिपायाने कारेगाव परिसरातील नवले मळा येथे एका विहिरीतील रहाटाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस शिपाई जितेंद्र उर्फ हरिभाऊ केशव मांडगे ( वय ३४) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर येत आहे.जितेंद्र मांडगे हे शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शिपाई पदावर कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते. त्या तणावातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी नातेवाईकांना आपण आत्महत्या करत असल्याचे फोन करून सांगितले होते. त्यांनतर त्यांनी कारेगाव नजीक नवले मळा येथील विहिरीत रहाटाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी याबाबत माहिती मिळाली आहे.पोलिसाने आत्महत्या केल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी मांडगे यांना शिरूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानुसार शिरूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा तपास पुढील तपासासाठी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला आहे. मांडगे यांना कुठला मानसिक त्रास होता याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. जनतेचे रक्षकच असे खचून जाऊ लागले तर जनतेकडे लक्ष कोण देणार? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. जितेंद्र मांडगे हे सरळ स्वभावाची व्यक्ती होती. सर्वांशी मिळून मिसळून राहणे असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.