
२८ वर्षीय ही मूळची न्यूयॉर्कची आहे. विशेष म्हणजे तिची एकूण संपत्ती यावेळी सर्वाधिक आहे. निव्वळ संपत्तीच्या बाबतीत तिने स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर आणि राफेल यांनाही मागे टाकले. जेसिका सध्या सर्वात श्रीमंत टेनिसपटू आहे.जेसिका आहे सर्वात श्रीमंत टेनिसपटू अमेरिकेची जेसिका पेगुला सध्या सर्वात श्रीमंत टेनिसपटू आहे. यावेळी तिच्यापेक्षा जास्त संपत्ती दुसऱ्या कोणत्याही खेळाडूकडे नाही.जेसिकाची एकूण संपत्ती ६.७ अब्ज डॉलर आहे. जेसिका पेगुलाची एकूण संपत्ती ६.७ अब्ज डॉलर आहे. भारतीय रुपयात जेसिका ५,५२,१०,३४,५०,००० कोटी रुपयांची मालकीण आहे. जेसिकाची संपत्ती रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यापेक्षा जास्त आहे. नदालची एकूण संपत्ती $२२० दशलक्ष आहे. तर फेडररकडे $५५० दशलक्ष आहेत.वडील आहेत जगातील ३७७ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती जेसिका पेगुलाचे वडील टेरी पेगुला हे खूप मोठे अमेरिकन व्यापारी आहेत. ते जगातील ३७७ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.जेसिकाची संपत्ती विराट कोहलीपेक्षा जास्त आहे भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीच्या एकूण संपत्तीचीही बरीच चर्चा आहे. विशेष म्हणजे जेसिकाची संपत्ती विराटपेक्षा कितीतरी जास्त आहे. विराटची एकूण संपत्ती १२२ दशलक्ष डॉलर आहे. तर जेसिका ६.७ अब्ज डॉलरची मालकीण आहे.फ्रेंच ओपनमधून गेली बाहेर जेसिका पेगुला अलीकडेच फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत एलिस मर्टेन्सकडून पराभूत झाली.