विघ्नहर्त्याला निरोप देताना विघ्न, कर्जतमधील विसर्जन मिरवणुकीत अनर्थ; एकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 29, 2023

विघ्नहर्त्याला निरोप देताना विघ्न, कर्जतमधील विसर्जन मिरवणुकीत अनर्थ; एकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता

https://ift.tt/VeOyTN1
रायगड:रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मौजे चांधई येतील उल्हास नदी पात्रात गणपती विसर्जन करते वेळी तीन जण नदीपात्रात बुडाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्देवी घटनेमुळे रायगड जिल्ह्यात कर्जत येथील विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीनजण उल्हास नदी पात्रात बुडाले असून त्यापैकी यश जगदीश साहू (वय १४ ) याचा मृत्यू झाला आहे. असून त्यांना कर्जत येथे रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला होता. चेतन सोनावणे (वय 2६) व जगदीश शाहू (वय ४०) हे अद्याप सापडले नसून शोधकार्य चालू आहे. जगदीश व यश हे दोघेही पुण्याचे राहिवाशी आहेत. एक व्यक्ती चेतन हा हुकूळ गावातील आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत नदीकिनारी हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. या घटनेचे वृत्त कळताच कर्जतचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री.लागरे, पोलीस निरीक्षक श्री. गरड तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे आदींनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. कर्जत येथील गुरुनाथ साटलेकर रेस्क्यू टीम यांच्याकडून तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आलं होत. दरम्यान या घटनेत रोहन जेना १२ वर्षीय अल्पवयीन मुलाला वाचवण्यात मोठे यश आला आहे. हा मुलगा बुडत असल्याचे पाहून त्याच्या वडिलांनी त्याला घट्ट धरल्याने सुदैवाने तो बचावला आहे. तर बुडालेला यश याचा मृतदेह मिळाला आहे. या घटनेत दोन जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे रात्र झाल्याने हे शोध कार्य थांबवण्यात आलं असून आज २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान पुन्हा शोधू कार्य सुरू केले जाणार आहे. या सगळ्या घटनेची नोंद कर्जत पोलीस ठाण्यात करण्याची कार्यवाही सुरू आहे.