
मुंबई : अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी चौपाटीवर येणाऱ्या गणरायांचे देखणे रूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविक गर्दी करतात. या भाविकांची रात्री उशिरानंतर गैरसोय होऊ नये म्हणून यंदा मुंबई लोकलवर १८ विशेष फेऱ्या धावणार आहेत. गुरुवारी मध्यरात्रीनंतर शुक्रवारी पहाटेपर्यंत मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत.विसर्जनानिमित्त रेल्वे प्रशासनाची घोषणामुख्य मार्ग (मध्य रेल्वे)सीएसएमटी ते कल्याण : मध्यरात्री १.४० आणि ३.२५सीएसएमटी ते ठाणे : मध्यरात्री २.३०कल्याण ते सीएसएमटी : मध्यरात्री १२.०५ठाणे ते सीएसएमटी : मध्यरात्री १.०० आणि २.००हार्बर मार्गसीएसएमटी ते बेलापूर : मध्यरात्री १.३० आणि २.४५बेलापूर ते सीएसएमटी : मध्यरात्री १.१५ आणि २.४५पश्चिम रेल्वेचर्चगेट ते विरार : मध्यरात्री १.१५, १.५५, २.२५ आणि ३.२०विरार ते चर्चगेट : मध्यरात्री १२.१५, १२.४५, १.४० आणि ३.००चर्नी रोड स्थानकासाठी उपाययोजना२८ सप्टेंबरला सायंकाळी ५ ते रात्री ८.३० दरम्यान धावणाऱ्या सर्व जलद लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. चर्नी रोड स्थानकातील गर्दी नियोजनासाठी सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत फलाट क्रमांक दोनवर धीमी लोकल थांबणार नाही, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.