मुंबईतील अमराठी टॉवर्समध्ये अलिखित फतवा; मांसाहारींना दरवाजे बंद, एजंट्सना स्पष्ट सूचना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 1, 2023

मुंबईतील अमराठी टॉवर्समध्ये अलिखित फतवा; मांसाहारींना दरवाजे बंद, एजंट्सना स्पष्ट सूचना

https://ift.tt/pFua6PA
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: तृप्ती देवरुखकर या मराठी तरुणीस मुलुंडमध्ये कार्यालय नाकारल्याच्या प्रकरणाचे पडसाद उमटत असतानाच मुंबईसह महामुंबईत मांसाहार करणाऱ्यांना विकत वा भाड्याने घर मिळत नसल्याचा वाद चर्चेस आला आहे. धर्म, जात, पंथांच्या व्यक्तींना घरे नाकारले जात असल्याच्या प्रकारांप्रमाणे काही शाकाहारी वसाहतींमध्ये मांसाहारींना घरे दिली जात नाहीत. यासाठी काही वेळा उघड तर काही वेळेस छुप्या पद्धतीने मांसाहारी व्यक्तींना घरे देणे टाळले जाते. नव्याने घरे घेण्याप्रमाणेच पुनर्विकासामुळे भाड्याने घर घ्यावे मांसाहारींना या शाकाहारी वसाहतींमध्ये घरे मिळत नसल्याच्या समस्येने ग्रासले आहे. या प्रश्नावर राजकीय पक्षही आणि स्थानिक राजकीय नेते कोणतीही भूमिका घेत नसल्याचाही सूर व्यक्त होत आहे.मुंबईचे स्वरूप कॉस्मोपॉलिटन आहे असे जात असले तरीही काही भागांतील वसाहतींमध्ये धर्म, जात, पंथांतील व्यक्तींप्रमाणेच मांसाहारींना प्रवेश निषिद्ध असल्याची उदाहरणे आढळत आहेत. त्यात काही वसाहतीत मांसाहारींना बिलकूल प्रवेश दिला जाणार नसून ती दारे बंद केले जातात. अशी अनेक उदाहरणे मुंबईतील बऱ्याच भागात दिसतात. घरांच्या खरेदी, विक्री, भाड्याच्या घरांसाठी इस्टेट एजंटप्रमाणेच ऑनलाइन पोर्टलचा पर्याय आहे. यातील एजंट्सना कोणत्या वसाहती, घरांमध्ये मांसाहार चालणाऱ्यांना घरे विकत वा भाड्याने देऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या जातात. तसेच, ऑनलाइन पोर्टलवरून आलेल्या माहितीच्या आधारे ग्राहकांनी घरमालकांना फोन केल्यावर तिथेही मांसाहारी असल्यास घर भाड्याने वा विकत देण्यास नकार दिला जात असल्याचा अनुभव येतातत. याबाबत ग्राहकांकडून कोणतीही तक्रार केली जात नसल्याचेही बोलले जाते. मात्र, अशाप्रकारे घरे, मालमत्ता घेण्यासाठी बंधने आणणे कायद्याच्या चौकटीत बसत नसले तरीही त्याचे उघड उल्लंघन होत आहे. त्यावर तक्रारी होत नसल्याने कारवाई होत नसल्याचे सांगण्यात येते.मुंबईत मराठी टक्का किती उरला यावर चर्चा होत असतानाच शाकाहार विरोधात मांसाहार असे चित्र निर्माण झाले आहे. त्याविरोधात उघडपणे फारसा विरोध होत नसल्याने केवळ मांसाहार नको या कारणामुळे मांसाहारींना घरे मिळण्यासाठी बरीच धावपळ करावी लागत आहे.इस्टेट एजंट्साठीही स्पष्ट सूचना:अमराठी आणि शाकाहारींचे वर्चस्व असलेल्या नव्या टॉवरमध्ये घरांसाठी केवळ शाकाहारी असणाऱ्याच संभाव्य ग्राहकांपर्यंत जा, अशा स्पष्ट सूचना विकासकांकडून इस्टेट एजंट्सना दिल्या जात असल्याचे सांगण्यात येते. या सर्वांतून मांसाहारींना घरे मिळविण्यासाठी बरीच खटपट करावी लागत आहे. या सर्वांमुळे चांगली घरे हातातून जात असल्याची खंत गृहखरेदीदारांची आहे.मांसाहार नसल्यास घर: दक्षिण मुंबईत काही ठिकाणी घरांत मांस, मासे शिजविणार नाहीत, अशा अटींवर मांसाहारींना घरे मिळाली आहेत. तसा कोणताही लेखी करार नसला तरीही गरजेपोटी घरे घेतली जात आहेत.