हुंडाईचे एमडी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; पुण्यात ७००० कोटींची गुंतवणूक, प्रकल्पाला पाठिंबा देण्याचे आश्वासन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 14, 2024

हुंडाईचे एमडी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; पुण्यात ७००० कोटींची गुंतवणूक, प्रकल्पाला पाठिंबा देण्याचे आश्वासन

https://ift.tt/ZdiOqfN
पुणे: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुंडाई मोटर इंडियाचे एमडी आणि सीईओ किम उनसू, कार्यकारी संचालक जेब्ल्यू रू आणि हुंडाई मोटर इंडियाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. ही भेट हुंडाई मोटर इंडियाच्या तळेगाव पुणे येथील ७००० कोटींच्या गुंतवणूकीवर होती. हुंडाई मोटर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील बैठकीत महत्वाची माहिती दिली, असे देवेंद्र फडणविसांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, Hyundai Motor India (HMI) चे MD आणि CEO किम उनसू आणि कार्यकारी संचालक J.W Ryu आणि HMI वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून खूप आनंद झाला. तसेच त्यांनाही विविध पैलूंवर सल्ला आणि मदत आणि सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मी त्यांना आमच्या सरकारच्या वतीने पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार करण्यासाठी ते पुढील आठवड्यात दावोसला भेट देत आहेत. ही गुंतवणूक हुंडाईच्या तामिळनाडू प्रकप्लाच्या विकासातील हुंडाईचा पहिला उपक्रम आहे. त्यांनी तामिळनाडूमध्ये त्यांचा चांगला ठसा उमटवला आहे. तिथे त्यांची कंपनी २५ वर्षांपेक्षा अधिक काळ काम करत आहे.