बेरोजगारी मिटवेन, कोकणचा कॅलिफोर्निया करतो, मला लोकसभेवर पाठवा : नारायण राणे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, April 27, 2024

बेरोजगारी मिटवेन, कोकणचा कॅलिफोर्निया करतो, मला लोकसभेवर पाठवा : नारायण राणे

https://ift.tt/RxE8NBo
प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात उद्योगधंद्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देत जर मला निवडून दिले तर कोकणचा कॅलिफोर्निया करू असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री व मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार यांनी केले आहे. रत्नागिरी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे साहेब यांच्या प्रचारार्थ राजापूर, रत्‍नागिरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य जाहीर सभा आज पार पडली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, किरण सामंत, माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, बाळ माने, अजित यशवंतराव शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, सर्व महायुतीचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेरोजगारी मिटवेन, कोकणचा कॅलिफोर्निया करतो

राणे पुढे म्हणाले की, कोकणात बेकारी ही समस्या आहे. भविष्यात कोकणात उद्योगधंदे यावेत यासाठी प्रयत्न करणार आहे. तुम्ही मला निवडून दिले तर मी तुम्हाला रोजगार देऊन बेरोजगारी मिटवेन. कोकणाचा कॅलिफोर्निया करेन. मी कुठेही असलो तरी मी कोकणाचा विकास करेन. भारत हा विकसित देश बनवण्याचा संकल्प झाला असून त्यात कोकणातील एक जागा असायला पाहिजे. जगात भारताचे नाव विकसित देश असे व्हायला सुरूवात झाली असून २०३० साली आपला देश अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर येईल.

राणे नक्की लोकसभेत जातील, पालकमंत्री म्हणून विश्वास देतो

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जे चारशे खासदार निवडून येतील, त्यामध्ये मोठ्या मताधिक्याने नारायण राणे असतील, असा विश्वास पालकमंत्री या नात्याने शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी दिला आहे.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत असून महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत रिंगणात आहेत. राणे व राऊत यांच्यात ही प्रामुख्याने लढत होणार आहे. लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोकण दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍याकडेही अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.