माझ्या सारख्याला तर शरमच वाटली असती, लाजच वाटली असती, की बाबा कुठल्या...; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर प्रहार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, April 28, 2024

माझ्या सारख्याला तर शरमच वाटली असती, लाजच वाटली असती, की बाबा कुठल्या...; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर प्रहार

https://ift.tt/DqWl4XE
पुणे (आदित्य भवार) : बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार जोर धरू लागला आहे. मतदानाची तारीख जवळ येत असताना नेते मंडळी विरोधकांचे वभाडे काढत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर आज २०१९च्या निवडणुकी वेळी सुप्रिया सुळेंनी दिलेलं आश्वासनाची आठवण काढत त्यांची मिमिक्री केली. २०१९ला त्यांनी जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून टीका ही केली. भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला या प्रसंगी अजित पवार बोलत होते. मी सकाळी सहा वाजता उठून काम करणारा कार्यकर्ता आहे. मी जिथे कुठे मुक्कामाला असेल त्या ठिकाणी मी सहा वाजता उठून कामाला लागतो. मला काम करण्याची आवड आहे. मी १९९१ला खासदार असताना पिंपरी चिंचवडचा एवढा बदल करून दाखवला, याचा अर्थ आम्ही काम करतो. ढगात गोळ्या मारत नाही, वेळ मारून नेत नाही, आम्ही खोट बोलत नाही. "तुम्ही मला निवडूण द्या मी २०१९ पर्यंत एमआयडीसी करीन" (असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंची मिमिक्री केली) तरी देखील माणूस पुन्हा २०१९ला मत मागायला येतो. माझ्या सारख्याला तर शरमच वाटली असती, लाजच वाटली असती, की बाबा कुठल्या तोंडून मी मत मागायला जाऊ, असे म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर तिखट शब्दात प्रहार केला. पुढे ते असंही म्हणले, मित्रांनो मी शब्दाचा पक्का आहे. मी सहसा शब्द देत नाही आणि दिला तर पूर्ण करायला कोणच्या बापाला ऐकत नाही, असेही अजित पवार म्हणाले. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या टीका करताना भोर तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भोर तालुक्यात गेले अनेक दिवस एमआयडीसीच आश्वासन स्थानिक लोकांना दाखवले जात आहे. परंतु पूर्ण होत नाही, परिणामी लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा समोर आले आहे. मात्र आता याचा फटका सुप्रिया सुळे यांनी किती बसतोय हे पाहणे महत्वाचे असेल.