अरमानी फॅशन बँडचे मालक जॉर्जिओ अरमानी यांचे निधन, 10 लाख कोटींचं साम्राज्य कसं उभं केलं? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 5, 2025

अरमानी फॅशन बँडचे मालक जॉर्जिओ अरमानी यांचे निधन, 10 लाख कोटींचं साम्राज्य कसं उभं केलं?

अरमानी फॅशन बँडचे मालक जॉर्जिओ अरमानी यांचे निधन, 10 लाख कोटींचं साम्राज्य कसं उभं केलं?

Giorgio Armani Died : इटलीचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जिओ अरमानी गुरुवारी (4 सप्टेंबर) यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. अरमानी हे जगातील प्रसिद्ध अशा अरमानी या फॅशन ब्रँडचे मालक होते. कधीकाळी त्यांनी कॉलेज मध्येच सोडून फॅशन विश्वात पाऊल ठेवले. प्रचंड मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर त्यांनी फॅशन जगतात स्वत:चे विश्व निर्माण केले होते. आजघडीला त्यांनी अभा केलेला अरमानी हा फॅशन ब्रँड श्रीमंतीचे प्रतिक मानला जातो.

अरमानी यांनी आतापर्यंत काय काय केलं?

जॉर्जिओ अरमानी साधारण 10 लाख कोटींची संपत्ती मागे सोडून गेले आहेत. अरमानी फॅशन ब्रँड उभा केल्यानंतर त्यांनी त्यांच्या उद्योगाचा वेगवेगळ्या क्षेत्रात विस्तार केला. आजघडीला त्यांच्या अनेक आलिशान हॉटेल्स आहेत. क्रीडा, संगीत क्षेत्रातही त्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. अरमानीऑलम्पिया मिलेनो या इटायलियन बास्केटबॉल क्लबचे मालक होते. त्यांनी इटलीच्या ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक संघांसाठी जर्सीदेखील डिझाईन केली होती.

अरमानी फॅशन ब्रँडची कशी सुरुवात झाली?

अरमानी यांनी मध्येच शिक्षण सोडून दिले. ते एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यांनी काही काळासाठी नंतर सैन्यात नोकरी केली. त्यानंतर त्यांनी विंडो ड्रेसरचीही नोकरी केली. पुढे नीनो सेरुटी यांच्यासाठी काही काळ कपडे डिझाईन केले. नंतर शेवटी 1970 च्या दशकात त्यांनी आपले सहकारी सर्जियो गॅलोटी यांच्या सातीने स्वत:चा फॅशन ब्रँड चालू केला.

10 लाख कोटींचं साम्राज्य कसं उभं केलं?

अरमानी यांनी स्वत:चा फॅशन ब्रँड चालू केल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्यांनी 1980 साली त्यांना ब्लॉकबस्टर गिगोला या अमेरिकन चित्रपटासाठी रिचर्ड गियरची वॉर्डरोब डिझाईन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी परफ्यूम, मेकअप, स्पोर्ट्सवियर, इंडिरियर डिझाईन, रियल इस्टेट, रेस्टॉरंट, हॉटेलपर्यंत आपल्या उद्योगाचा विस्तार केला. फोर्ब्सनुसार त्यांची एकूण संपत्ती ही 12.1 अब्ज डॉलर्स म्हणजेच साधारण 10 लाख कोटी रुपये आहे.

दरम्यान, अरमानी यांच्या जाण्याने फॅशन जगताला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आपल्या काळात तयार केलेल्या फॅशन डिझाईन्स आजही कुतुहलाचा विषय असतो.