शत्रूही हल्ला करण्यापूर्वी विचार करेल… इराणच्या धमकीने जगात खळबळ; युद्धाचा भयंकर अंत होणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 17, 2026

शत्रूही हल्ला करण्यापूर्वी विचार करेल… इराणच्या धमकीने जगात खळबळ; युद्धाचा भयंकर अंत होणार?

शत्रूही हल्ला करण्यापूर्वी विचार करेल… इराणच्या धमकीने जगात खळबळ; युद्धाचा भयंकर अंत होणार?

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. दोन्ही बाजूंनी शक्तिशाली हल्ले केले जात आहेत. या युद्धात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र तरीही इराण प्रतिकार करत असून यामुळे अमेरिकेलाही घाम फुटला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे इराणची कोंडी करण्यासाठी जगभरातील देशांची मदत मागताना दिसत आहे. मात्र अनेक देशांनी अमेरिकेला साथ देण्यास नकार दिला आहे. त्यानंतर आता इराणकडून अमेरिका आणि इस्रायलला सर्वात मोठी धमकी देण्यात आली आहे. ज्यामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. इराणने नेमकं काय म्हटलं ते जाणून सविस्तर जाणून घेऊयात.

इराणची शत्रूला धमकी

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला गंभीर इशारा देताना म्हटले की, ‘मध्यपूर्वेत सुरू असलेले युद्ध अशा प्रकारे संपले पाहिजे की शत्रू देश पुन्हा कधीही इराणवर हल्ला करण्याचा विचारही करणार नाहीत. मला वाटते की आतापर्यंत त्यांना धडा मिळाला आहे आणि ते समजले आहेत की ते कोणत्या प्रकारच्या राष्ट्राशी सामना करत आहेत. इराण आपल्या आत्मसंरक्षणात कधीही संकोच करणार नाही आणि युद्ध पुढे नेण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.’

होर्मुज सामुद्रधुनीबाबत इराणची भूमिका

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी तस्नी न्यूज एजन्सीला सांगितले की, हा मार्ग पूर्णपणे बंद केलेला नाही. प्रादेशिक देशांना आवश्यक इशारे आधीच देण्यात आले आहेत. मात्र इराणवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही देशासाठी हा महत्त्वाचा जलमार्ग खुला राहणार नाही. अमेरिका आणि इस्रायलमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जहाजांची वाहतूक ही विशेष परिस्थितीतच होईल. त्यांनी असेही म्हटले की, इराणचे सशस्त्र दल या होर्मुज सामुद्रधुनी नियंत्रण ठेवत आहेत. कोणताही देश इराणवर हल्ला करण्यासाठी या मार्गाचा वापर करू शकत नाही.’

युद्धविरामाबाबत स्पष्ट भूमिका

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी, ‘इराण आपल्या संरक्षणासाठी कोणतीही तडजोड करणार नाही आणि आवश्यक असेपर्यंत युद्ध सुरू ठेवेल. तसेच अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या लष्करी संघर्षानंतर इराणने कोणताही युद्धविरामाचा संदेश किंवा विनंती केलेली नाही.’