'विक्रम'ची चंद्रावर हार्ड लँडिंग, नासाने प्रसिद्ध केली छायाचित्रे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 27, 2019

'विक्रम'ची चंद्रावर हार्ड लँडिंग, नासाने प्रसिद्ध केली छायाचित्रे

https://ift.tt/2nD7jDe
वॉशिंग्टन: '' या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने '' मोहिमेतील प्रसिद्ध केली आहेत. 'विक्रम' लँडर चंद्रावर उतरताना जोरात आदळले असे नासाने या छायाचित्रांच्या आधारे स्पष्ट केले आहे. नासाने प्रसिद्ध केलेली ही हाय रेझॉल्यूशन छायाचित्रे ऑर्बिटरद्वारे खेचलेली आहेत. विक्रम लँडरने चंद्रावरील एका सपाट भूमीवर उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र विक्रमचे हे उतरणे अपेक्षेनुसार होऊ शकले नाही. या नंतर ७ सप्टेंबरला विक्रमचा इस्रोशी संबंध तुटला. विक्रम चंद्रावर उतरताना जोराने आदळले हे स्पष्ट झाल्याचे नासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. विक्रम नेमक्या कोणत्या जागी आदळले हे अजूनही निश्चितपणे सांगता येत नाही. ही छायाचित्रे १५० किमी इतक्या अंतरावरून काढण्यात आली आहे. स्थानाबाबत अजूनही संशय विक्रमला ७ सप्टेंबरला चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरायचे होते. चंद्रावर अलगद उतरण्याचा भारताचा हा पहिलाच प्रयत्न होता. नासाचे ऑर्बिटर (एलआरओ) विक्रम जेथे उतरले त्या जागेवरून १७ सप्टेंबर या दिवशी गेले. त्याच वेळी ही हाय रेझॉल्यूशन छायाचित्रे टिपण्यात आल्याचे नासाने म्हटले आहे. अजूनही एलआरओसीच्या टीमला छायाचित्रे आणि लँडरच्या ठिकाण कोणते हे ओळखता आलेले नाही. ऑक्टोबरमध्ये विक्रमची छायाचित्रे टिपण्याचा प्रयत्न नासाचे ऑर्बिटर पुन्हा एकदा लँडिंग ठिकाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नासाने म्हटले आहे. १४ ऑक्टोबर या दिवशी प्रकाशाची स्थिती चांगली असेल आणि याचाच फायदा घेत पुन्हा छायाचित्रे टिपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जेव्हा ही छायाचित्रे टिपण्यात आली तेव्हा तिथे धुके होते. अशाच धुक्याने वेढलेल्या जागेवर असू शकते आणि म्हणूनच ते दिसत नसावे अशी माहिती लूनार रिझॉनन्स ऑर्बिटर मोहिमेचे उप प्रकल्प शास्त्रज्ञ जॉन केलर यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. ऑक्टोबरमध्ये चांगला प्रकाश असेल आणि याचा फायदा उठवत पुन्हा छायाचित्रे काढली जातील असेही केलर म्हणाले.