शाहरुखचा चित्रपट ब्रेक; पत्नी गौरी खुश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 28, 2019

शाहरुखचा चित्रपट ब्रेक; पत्नी गौरी खुश

https://ift.tt/2lNqeL1
मुंबई: 'झिरो' सिनेमानंतर अभिनेता याने एकाही नव्या सिनेमाची घोषणा केलेली नाही. या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर त्याचे चाहते त्याला मिस करणार आहेत. शाहरुख म्हणालाय की आता त्याला ब्रेकची गरज आहे आणि तूर्त तो एकही सिनेमा करत नाहीए. फॅन्स शाहरुखच्या या निर्णयामुळे निराश असले तरी त्याची पत्नी गौरी मात्र खूप खुश आहे. गौरीने एका मुलाखतीदरम्यान शाहरुखच्या ब्रेकबाबत सांगितले. गौरीने सांगितले की, 'मला वाटतं याची गरज होती. मी खूप खूश आहे, कारण आता मी बाहेर ये-जा करू शकते आणि तो घरात राहील. तो आता अबरामची चांगली काळजी घेईल. मी खूपच एक्सायटेड आहे. जर मी अबरामसाठी नसेन तर शाहरुख असेल.' गौरी सुहाना आणि आर्यनला मिळणाऱ्या मीडिया अटेंशनबद्दलही बोलली. ती म्हणाली, 'ती दोघंही परदेशात आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. म्हणून मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून दूर आहेत.' शाहरुख खानचा सिनेमा 'झिरो' मागील वर्षी डिसेंबरमध्ये आला होता. त्यानंतर त्याच्या चाहत्यांना त्याच्या पुढील सिनेमाच्या घोषणेची प्रतीक्षा होती. आता शाहरुखच्या वाढदिवशी (२ नोव्हेंबर) कदाचित तो त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा करेल.