अग्रणी नदीचं पाणी वाढलं; बाप-लेक गेले वाहून - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 6, 2019

अग्रणी नदीचं पाणी वाढलं; बाप-लेक गेले वाहून

https://ift.tt/2OlRhZI
: तालुक्यात जोरदार पावसामुळे अग्रणी नदीला मोठ्याप्रमाणात पाणी आले आहे . या पाण्यात बाप-लेक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे घडली . देशिंगहून कवठेमहांकाळकडे आरती साठी येत असताना मोरगाव येथील पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने बाप-लेक वाहून गेले. योगेश पवार आणि त्याची ६ वर्षांची मुलगी श्रेया पवार असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत. पहाटे च्या सुमारास दुचाकीवरून योगेश पवार हे मुलगी श्रेया आणि पुतण्या असे तिघेजण देशिंगहुन कवठेमहांकाळ येथे आरतीसाठी येत होते. यावेळी मोरगाव गावााातीलल पुलावरून अग्रणीचे पाणी वाहत होते.पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह हे तिघेजण पाण्यात वाहून गेले. यात पुतण्या पोहत बाहेर आला ,त्यामुळे त्याचा जीव वाचला. वाहून गेलेल्या बाप लेकीचा शोध कवठेमहांकाळ पोलीस आणि नागरिक करत आहेत.