नको त्या मागण्या वाढत होत्या,म्हणून निर्णय: अजित पवार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 23, 2019

नको त्या मागण्या वाढत होत्या,म्हणून निर्णय: अजित पवार

https://ift.tt/34c9duV
मुंबई: महाराष्ट्रातल्या राजकारणाने आज पहाटे अचानक एक वेगळंच वळण घेतलं आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 'चर्चा संपत नव्हती. नको त्या गोष्टींच्या मागण्या वाढत होत्या. असंच सुरू झालं तर स्थिर सरकार कसं मिळणार हा माझ्यापुढे होता. म्हणून मी हा निर्णय घेतला,' असं अजित पवार म्हणाले. अजित पवार म्हणाले, 'कोणत्याच पक्षाला सरकार स्थापन करता आलं नाही. राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या, दुष्काळासारखा प्रश्न आ वासून उभा असताना राज्याला स्थिर सरकारची अत्यंत गरज होती. सरकार स्थापनेच्या दृष्टीने कोणताही निर्णय होत नव्हता. त्यामुळे हे सरकार स्थापन झाले आणि मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा देतो की त्यांना अखेर स्थिर सरकार मिळाले आहे,' दरम्यान, देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राज्यात कुठलंही सरकार स्थापन होऊ शकलं नाही. राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली. सत्ता स्थापनेच्या दृष्टीने प्रयत्न सुरू होते, पण ते खिचडी सरकार होते. अशावेळी राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते अजित पवार यांनी निर्णय घेतला की ते भारतीय जनता पक्षाला समर्थन देतील आणि त्यानुसार राज्यपाल महोदयांनी सरकार स्थापनेच्या दृष्टीने संख्याबळाची खातरजमा करून आज पहाटे आम्हाला सरकार स्थापनेसाठी बोलावलं.'