
मुंबईः राज्याच्या राजकारणात आज भल्या पहाटे एक वेगळीच कलाटणी मिळाली असून देवेंद्र यांनी आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात आज भूकंप झाला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असताना आज भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केल्याने सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत. परंतु, या सर्व घडामोडींना जबाबदार असल्याचा आरोप नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.