आसामः ATM रिकामे; चिकनचे दर ५०० ₹ किलो - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 15, 2019

आसामः ATM रिकामे; चिकनचे दर ५०० ₹ किलो

https://ift.tt/2YOT9NT
गुवाहाटीः आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये कायद्याला विरोध कायम असून, यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गुवाहाटीमध्ये अन्नधान्य मिळण्यात मोठी अडचण येत असून, टंचाईमुळे दर गगनाला भिडले आहेत. बँकांच्या एटीएममधील रोख रक्कम संपुष्टात येत आहे. इंधन पोहोचू शकत नसल्यामुळे पेट्रोल पंप ओस पडताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर चिकनचा दर प्रतिकिलोसाठी ५०० रुपयांवर पोहोचला आहे. गुवाहाटीमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी शनिवारी शिथिल केल्यानंतर नागरिक गरजेच्या वस्तू, अन्नधान्य खरेदी करण्यासाठी बाहेर पडले. यावेळी बाजारात कांद्याचे दर २५० रुपये, बटाटे ६० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. चिकनचे दर प्रतिकिलोसाठी ५०० रुपये, तर मासे ४२० रुपयांनी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर १० रुपयांना मिळत असे. आता याच पालकजुडीची किंमत ६० रुपये झाली आहे. गुवाहाटीमधील बाजार हा बाहेरील साधनांवर अवलंबून आहे. गुवाहाटीमधील खरेदी-विक्री घाऊक पद्धतीने चालते. अन्नधान्याचा मर्यादित साठा आम्ही करू शकलो. त्यामुळे शनिवारी बाजार सुरू होताच काही मिनिटांमध्ये सर्व साठा संपला, अशी प्रतिक्रिया घाऊक विक्रेत्यांनी दिली आहे. गेल्या रविवारपासून पश्चिम बंगाल-आसाम सीमेवर कृषी उत्पादने असलेली हजारो अडकून पडल्याची माहिती मिळाली आहे. गुवाहाटीमध्ये सुरू असलेल्या निदर्शने आणि संचारबंदीमुळे पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सामान्य जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. पुरवठा नसल्यामुळे किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोमवारपर्यंत बाजारातील स्थिती पूर्वपदावर येईल, अशी आम्हाला आशा आहे, अशी प्रतिक्रिया आसाम चेंबर ऑफ कॉमर्सचे महासचिव शिशिर देव यांनी दिली आहे.