उ. महाराष्ट्रात का हरलो?; BJP अहवाल बनवणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 14, 2019

उ. महाराष्ट्रात का हरलो?; BJP अहवाल बनवणार

https://ift.tt/36xKty8
नाशिक: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जाहीर नाराजीनंतर भाजपनं आता 'डॅमेज कंट्रोल'चा पवित्रा घेतला आहे. खडसेंचं प्रभावक्षेत्र असलेल्या उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पराभव का झाला, याचा अहवाल भाजपकडून तयार केला जाणार आहे. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी यांच्या पराभवाचं विश्लेषणही यातून पुढं येणार असल्यानं त्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार व माजी शिक्षणमंत्री यांनी ही माहिती दिली. 'मागील विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील १२ जागांवर भाजपचा पराभव झाला. त्याची नेमकी कारणं काय आहेत, याचा अहवाल बनविण्यात येणार नाही. तो अहवाल तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे,' असं शेलार यांनी सांगितलं.

वाचा:

गेल्या पाच वर्षांत पक्षांतर्गत राजकारणापासून दूर ठेवले गेलेले एकनाथ खडसे सध्या बंडाच्या पवित्र्यात आहेत. पक्षाच्या दुसऱ्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांनी पक्षाला आव्हान दिलं आहे. भाजपमध्ये राहीन की नाही याचा भरोसा नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे. भाजपमधील नाराज ओबीसी नेत्यांची मोटही त्यांनी बांधली आहे. त्यामुळं भाजपमध्ये अस्वस्थता आहे. खडसे यांची नाराजी दूर करावी, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. तर, खडसे यांचं बंड गांभीर्यानं घेऊ नये, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. वाचा: या सगळ्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील पराभवाचा विश्लेषणात्मक अहवाल तयार केला जात आहे. त्याचे निष्कर्ष नेमके काय येतात? रोहिणी खडसे यांच्या पराभवाची नेमकी कोणती कारणे पुढं येतात? खडसे यांच्या आरोपांनुसार संबंधितांवर कारवाई होणार का?, या प्रश्नांची उत्तरं त्यातून मिळणार आहेत. त्यामुळं या अहवालाबाबत उत्सुकता आहे. वाचा: