सुपरमॉम! मॅच ब्रेकमध्ये बाळाला केलं स्तनपान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 11, 2019

सुपरमॉम! मॅच ब्रेकमध्ये बाळाला केलं स्तनपान

https://ift.tt/2E8sX7v
गुवाहाटी: सध्या एका 'सुपरमॉम'चा सुपर फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एक व्हॉलीबॉलपटू मॅच ब्रेकदरम्यान आपल्या सात महिन्यांच्या बाळाला स्तनपान करत असतानाचा हा फोटो पाहिल्यानंतर या 'सुपरवुमन'वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मिझोरामच्या लाल्वेंतलुआंगी या व्हॉलीबॉलपटूनं आपल्या कृतीनं सगळ्यांचीच मनं जिंकली. आयझोलमध्ये मिझोराम राज्य स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ती आपल्या सात महिन्यांच्या बाळालाही सोबत घेऊन आली होती. सामन्याच्या मध्यांतराला तिनं आपल्या बाळाला स्तनपान केलं. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हायरल फोटो पाहून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. काहींनी तिला सुपरवुमन आणि सुपरमॉम अशी उपाधी दिली. मिझोरामच्या सेरछिप जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या लाल्वेंतलुआंगी हिचा हा फोटो राज्याचे क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमाविया रॉयटे यांच्यासह कार्यक्रमाला उपस्थित काही जणांनी शेअर केल्यानंतर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. बक्षिसाचाही वर्षाव क्रीडा मंत्र्यांनी तिचा फोटो ट्विट करून 'सॅल्यूट मिस वेनी!' अशी कॅप्शन दिली. त्यानंतर अनेकांनी रिट्विट करून या स्पोर्ट्सवुमन आणि एक आई असल्याची जबाबदारी चांगल्या रितीनं निभावल्याबद्दल तिचं कौतुक केलं. एक आई म्हणून तिनं आधीच सगळ्यांना जिंकलं तर, दुसरीकडे तिच्या संघानं हा सामनाही जिंकला. त्यानंतर क्रीडा मंत्र्यांनी तिला रोख दहा हजार रुपये बक्षीसही जाहीर केलं. तिनं चेक-इनसाठीही परवानगी घेतली होती... हा फोटो तिच्या नकळत घेण्यात आला होता आणि तो प्रचंड व्हायरल होत असून, सुपरमॉमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लाल्वेंगतलुआंगीचा हा फोटो मातृत्व किती श्रेष्ठ असतं हे दाखवून देणारा आहे. फेसबुकवर एक पोस्टसुद्धा शेअर केली जात आहे. त्यानुसार, लाल्वेंगतलुआंगीनं बाळाला आयझोलमध्ये खेळाडूंच्या कॅम्पमध्ये सोबत घेऊन जाण्यासाठी चेक-इनची परवानगी मागितली होती.