आजचा दिवस कसा जाईल...जाणून घ्या भविष्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, January 21, 2020

आजचा दिवस कसा जाईल...जाणून घ्या भविष्य

https://ift.tt/2NI1ajy
- पं. डॉ. संदीप अवचट मेष : महत्त्वाची रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रिय व्यक्तीसोबत असलेले नाते अधिक घट्ट होईल. महिलावर्ग खरेदीत रमेल. वृषभ : परोपकारी वृत्ती आनंद देईल. भविष्यकालीन गुंतवणुकीसाठी पर्याय निवडाल. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीकडून अपमानास्पद वागणूक मिळेल. मिथुन : आर्थिक ताण निवळेल. महत्त्वाचे पत्र हाती येईल. मोकळा वेळ सत्कारणी लावाल. कर्क : भविष्यासाठी केलेली गुंतवणूक यशस्वी व्हावी, असे वाटेल. घरातील दूषित वातावरण पूर्ववत करण्यासाठी शांततेने विचार करा. विवाहितांना लाभ. सिंह : आवडत्या कामात वेळ जाईल. रक्कम उधार देणे टाळा. घरातील संरचना बदलण्याचे काम ज्येष्ठांच्या सल्ल्यानेच करावे. कन्या : आरामात पहुडण्याचा दिवस. नवीन पाहुण्याच्या आगमनाने आनंदित व्हाल. व्यावसायिकांनी अनुभवी व्यक्तींशी सल्लामसलत करावी. तुळ : फिरायला जावेसे वाटेल. नवीन योजनांची अंमलबजावणी लगेच करा. जोडीदाराच्या प्रेमाने भारावून जाल. वृश्चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रामाणिकपणे कामे पूर्ण कराल. महाविद्यालयीन मुलांना मार्गदर्शन कराल. धनु : अचानक धनलाभ होईल. दानधर्म कराल. कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल. मकर : कामकाजाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. शेतीविषयक प्रदर्शनातून महत्त्वाची माहिती मिळेल. नवीन परिचय होतील. कुंभ : भूतकाळातील आठवणी दाटून येतील. कुटुंबातील सदस्याशी आपुलकीने वागाल. वैयक्तिक छंद जोपासाल. मीन : घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून बचतीचे मार्ग माहिती करून घ्याल. आवडत्या व्यक्तीबरोबर आनंदाचे क्षण अनुभवाल. महत्त्वाची बातमी समजेल.