बाजारात नफेखोरी; सेन्सेक्समध्ये इतकी घसरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 15, 2020

बाजारात नफेखोरी; सेन्सेक्समध्ये इतकी घसरण

https://ift.tt/2QTNTWP
मुंबई : गुंतवणूकदारांनी प्रमुख शेअरची विक्री करत नफेखोरी केल्याने बुधवारी सकाळच्या सत्रात १८० अंकांनी घसरला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६० अंकांची घसरण झाली आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्ष लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जगभरातील निर्माण झाले आहे. यातून त्यांनी नफावसुलीचा मार्ग स्वीकारला. मागील दोन सत्रात तेजीने वधारलेल्या शेअर्समध्ये आज विक्रीचा सपाटा दिसून आला. सध्या सेन्सेक्स ४१७७३ अंकांवर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२३०० अंकांवर आहे. आशियातील शेअर बाजार स्थिर होते. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी ६४२ कोटींची विक्री केली. परकी गुंतवणूकदारांनी २०६ कोटींचे शेअर्स विक्री केले. आजच्या सत्रात बजाज ऑटो, एलअँडटी, एचयूएल, मारुती, ओएनजीसी , एचडीएफसी बँक, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, कोटक बँक, एसबीआय हे शेअर घसरले. हिरोमोटोकॉर्प, टायटन, सन फार्मा, टीसीएस, एचसीएल टेक या शेअरमध्ये तेजी आहे. तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होत असून बड्या कोर्पोरेट्सच्या कामगिरीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. येस बँकेच्या शेअरमध्ये ३ टक्के घसरण झाली. चलन बाजारात रुपया डॉलरसमोर ७०.९९ वर व्यवहार करत आहे.