दिल्ली: शहिदांना PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 26, 2020

दिल्ली: शहिदांना PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली

https://ift.tt/3aBWCVw
नवी दिल्ली: यांनी यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ४८ वर्षे जुनी परंपरा मोडून नवी परंपरा रूढ केली. येथे जाऊन त्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते. १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धातील शहिदांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती स्मारक १९७२ मध्ये इंडिया गेट येथे उभारण्यात आलं होतं. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख अमर जवान ज्योती स्मारक येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहतात. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात पहिल्यांदाच सीडीएस सहभागी झाले आहेत. माजी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी १ जानेवारीला सीडीएसचा पदभार स्वीकारला आहे. लष्करप्रमुख नरवणे, हवाई दल प्रमुख भदौरिया आणि नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांची गेल्या वर्षी या पदांवर नियुक्ती झाली आहे.

४४ एकर जागेत असलेले राष्ट्रीय युद्ध स्मारक अमर चक्र, वीरता चक्र, त्याग चक्र आणि रक्षक चक्र अशा चार विभागांमध्ये तयार केला आहे. त्यात २५९४२ जवानांची नावं ग्रेनाइटच्या टेबलेटवर सुवर्णाक्षरांनी कोरण्यात आली आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते गेल्या वर्षी २५ फेब्रुवारीला राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं होतं.