भाजपला ९ महिन्यांत बसले 'हे' ४ मोठे धक्के - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 12, 2020

भाजपला ९ महिन्यांत बसले 'हे' ४ मोठे धक्के

https://ift.tt/2vs1356
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठा धक्का दिला असून पक्षाला गेल्या ९ महिन्यांच्या काळात मिळालेला हा चौथा धक्का आहे. भाजपला या पूर्वी हरयाणा आणि महाराष्ट्रात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हरयाणामध्ये बहुमताचा आकडा गाठता न आल्यानं भाजपनं जेजेपीशी हातमिळवणी करत सत्तेत यावं लागलंय. तर, महाराष्ट्रात भाजप नेतृत्वातील युतीने निवडणुकीत मैदान मारलेले असतानाही शिवसेनेशी बिनसल्यानं सत्ता गमवावी लागली आहे. एका पाठोपाठ एक असे तिन धक्के बसल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाने भाजपला चौथा मोठा धक्का दिला आहे. डिसेंबर महिन्यात भाजपच्या हातून झारखंडही निसटलं. त्यानंतर जोरदा मुसंडी मारण्याचा इराद्याने मोठा प्रचार केलेला असतानाही दोनच महिन्यात पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्लीत भारतीय जनता पक्षाचा निवडणूक प्रचार हिंदू राष्ट्रवादावर आधारलेला होता. जम्मू आणि काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यासारख्या निर्णयाच्या जोरावर दिल्लीत मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा जोरदार प्रयत्न करून पाहिला. आता तयारी बिहारची भारतीय जनता पक्षाला झारखंडमध्ये स्थानिक नेते हेमंत सोरेन यांच्या शक्तीचा अंदाज लावता आला नाही. तर, दुसरीकडे दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने आखलेली रणनीती काही काम करू शकली नाही. तथापि, दिल्लीत भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली ही त्यातल्या त्यात जमेची बाजू. सन २०१५ मध्ये भाजपला दिल्लीत ३२.३ टक्के मतं मिळाली. तर यात वाढ होऊन या वेळी ती ३८.४३ टक्क्यांवर पोहोचली. मात्र, लोकसभा निवडणुकीत दिल्लीत मिळालेल्या ५६.५८ टक्के मतांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे. आता पुढील दोन विधानसभांसाठी भारतीय जनता पक्षाला आपली रणनीती बदलावी लागेल याचेच हे संकेत आहेत. बिहारमध्ये नोव्हेंबर, तर पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. दिल्लीत आपचे 'लोकल कार्ड' चालले आम आदमी पक्षाने आपला निवडणूक प्रचार करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका न करता स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. याचा फायदा आपला मिळाला. भाजपने देखील या निवडणुकीला मोदी विरुद्ध केजरीवाल असे स्वरुप दिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत केवळ दोनच सभा घेतल्या. मात्र, भाजपच्या इतर नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अनेक सभा घेतल्या होत्या.