सोने-चांदी गडगडले; सलग दुसऱ्या दिवशी बाजारात मोठी घसरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, August 12, 2020

सोने-चांदी गडगडले; सलग दुसऱ्या दिवशी बाजारात मोठी घसरण

https://ift.tt/2Fb6R7X
मुंबई : करोनावर लस शोधल्याचा रशियाने केलेला दावा आणि अमेरिकेकडून लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर होण्याच्या शक्यतेने कमॉडिटी बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली आहे. आणि चांदीच्या दरात प्रचंड घसरण होत असून ग्राहक मात्र आनंदून गेला आहे. कमॉडिटी बाजारात आज बुधवारी सोन्याचा भाव १४१५ रुपयांनी कमी झाला आहे. सोन्यात गुंतवणूकदारांनी नफावसुली सुरूच ठेवल्याने आज सोन्याचा भाव २.७२ टक्क्यांनी कमी झाला. विशेष म्हणजे बऱ्याच दिवसांनी सोन्याचा भाव ५० हजार रुपयांच्या आसपास आला आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव १० ग्रॅमला ५०५५० इतका खाली घसरला आहे. चांदीच्या भावात तब्बल ७.३४ टक्के घसरण झाला आहे. बाजारात तब्बल ४९०० रुपयांनी कमी झाला असून तो एक किलोला ६१६३० रुपयांवर ट्रेड करत आहे. गेल्या आठवड्यात कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ५६१९१ रुपयांवर गेला होता. मात्र त्याला नफेखोरांची नजर लागली. सराफांकडून सोन्यावर वस्तू आणि सेवा कर (GST) , घडणावळ मजुरी (Making Charges) आकारले जातात. त्यामुळे प्रत्यक्षात सोन्याचे दागिने खरेदी करताना सोन्याच्या किंमतीत ४ ते ५ हजारांची वाढ होते. भारतातच नव्हे तर जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. डॉलरचे मूल्य वधारत असल्याने मौल्यवान धातूची झळाळी कमी झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.सोन्याच्या किमतीत सोमवारी ०.३५ टक्क्यांची वाढ झाली होती. त्याच बरोबर चांदीचा भाव २ टक्क्यांनी वाढला होता. सोमवारी चांदी १५०० रुपयांनी महागली होती. तर मंगळवारी सोने ५ टक्क्यांनी स्वस्त झाले. काल बाजार बंद होताना सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५२३९० रुपये होता. चांदीमध्ये काल ७ टक्क्यांची घसरण झाली. जागतिक बाजारात मोठी घसरण करोना संकटावर उपाययोजना म्हणून अमेरिकेकडून लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर केले जाणार आहे. त्याशिवाय करोना रुग्णांची वाढती संख्या त्यावरील लशीचे संशोधन याचे पडसाद बाजारावर उमटत आहेत. त्यामुळे कमॉडिटी बाजारावरील दबाव वाढला आहे. स्पॉट गोल्डच्या किमतीत मंगळवारी ४.२ टक्क्यांची घसरण झाली असून सोन्याचा भाव प्रती औंस १९४१.७१ डॉलर इतका कमी झाला. सोमवारी तो २०२१.३२ डॉलर होता. चांदीच्या दरात देखील ७.८ टक्के घसरण झाली असून प्रती औंस भाव २६.८८ डॉलर झाला आहे. एक औंस म्हणजे किती ? वर्ल्ड कमॉडिटी मार्केटमध्ये सोन्याचे आणि चांदीचे औंस (per ounce) या प्रमाणात सौदे होतात. सोने चांदीचे मोठे व्यापारी, सराफ, साठेबाज यांच्याकडून औंसमध्येच खरेदी केली जाते. per ounce म्हणजे २८.३४९५ ग्रॅम वजन असते. त्यामुळे त्याची किमत भारतातील किमतीच्या तुलनेत जास्त असते. भारतीय बाजारात ग्रॅममध्ये सोन्याचे सौदे होतात.