हेरगिरी प्रकरण:'त्या' पत्रकाराच्या बचावात उतरले चीनचे 'ग्लोबल टाइम्स'! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 21, 2020

हेरगिरी प्रकरण:'त्या' पत्रकाराच्या बचावात उतरले चीनचे 'ग्लोबल टाइम्स'!

https://ift.tt/2ZQShdm
बीजिंग: चीनसाठी हेरगिरी करत संवेदनशील माहिती पुरवत असल्याचा आरोपाखाली अटक झालेले पत्रकार यांच्या बचावासाठी चीनच्या सरकारने वृत्तपत्र ग्लोबल टाइम्स उतरले आहे. शर्मा यांचे लेख ग्लोबल टाइम्समध्ये येणे ही सामान्य बाब असल्याचे संपादक हू शिजिन यांनी म्हटले. शर्मा यांनी भारत-चीन तणावावर 'ग्लोबल टाइम्स'मध्ये लेख लिहीला होता. यामध्ये लडाख तणावासाठी भारत जबाबदार असल्याकडे रोख होता, असे म्हटले जात आहे. 'ग्लोबल टाइम्स'मध्ये संपादकीय लिहून शिजीन यांनी आपली भूमिका मांडली आहे. शर्मा यांच्या अटकेनंतर ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखाची चर्चा केली जात आहे. भारत-चीन दरम्यान सुरू असलेल्या तणावात हा अन्यायकारक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतातील अनेक विचारवंत इंग्रजी भाषेतून विविध मुद्यावर ग्लोबल टाइम्समध्ये लिहीत आहेत. जवळपास १० वर्षांपूर्वी ग्लोबल टाइम्सची इंग्रजी आवृत्ती आल्यानंतर भारतीयांनी 'ग्लोबल टाइम्स'मध्ये मुक्त पत्रकार म्हणून लिहिणे ही सामान्य बाब झाली आहे. कथित हेरगिरीच्या प्रकरणात ग्लोबल टाइम्सला जोडले जात असून सनसनी निर्माण केली जात आहे. भारत सरकार आता चिनी माध्यमांवर निशाणा साधत असल्याचा आरोप त्यांनी केला. वाचा: वाचा: दरम्यान, दिल्लीत १४ सप्टेंबरला अटक करण्यात आलेला पत्रकार राजीव शर्मा याच्यासंदर्भात पोलिसांनी अनेक खुलासे केले आहेत. पत्रकार राजीव हा भारताच्या सीमेवरील रणनीची माहिती चीनच्या गुप्तचरांना देत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पत्रकार राजीव शर्मा याला पोलिसांनी ऑफिशल सीक्रेट अॅक्ट (Official Secrets Act) अंतर्गत अटक केली आहे. वाचा: वाचा: पत्रकार राजीव शर्मा २०१६ ते २०१८ पर्यंत चिनी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता. अनेक देशांमध्ये शर्माने चिनी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. राजीव शर्मा चिनी गुप्तचर यंत्रणेला सीमेवरील भारतीय लष्कराची तैनाती आणि भारताच्या सीमा रणनीतीबद्दलही माहिती चिनी गुप्तचर यंत्रणेला देत होता, असं दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे डीसीपी संजीव कुमार यादव यांनी सांगितलं. राजीव शर्माला पत्रकारितेचा जवळजवळ ४० वर्षांचा अनुभव असून तो चिनी सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ मध्ये तसेच भारतातील बर्‍याच माध्यम संस्थांसह संरक्षण विषयावर लिहित असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.